Google, Zoom ला जमलं नाही ते Mmhmm करणार, VIDEO कॉलसाठी नवं फीचर

सुरज यादव
Wednesday, 8 July 2020

 Mmhmm हे नव अ‍ॅप व्हिडिओ कॉल अजुन प्रभावी होण्यासाठी तयार करण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे. 

नवी दिल्ली - कोरोना व्हायरसला रोखण्यासाठी लॉकडाऊन केल्यानंतर व्हिडिओ कॉलमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. नोट टेकिंग अ‍ॅप एव्हरनोटचे सीईओ फिल लिबिन यांनी आता एक नवं अ‍ॅप तयार केलं आहे. Mmhmm हे नव अ‍ॅप व्हिडिओ कॉल अजुन प्रभावी होण्यासाठी तयार करण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे. यामध्ये जवळपास 33.75 कोटींची गुंतवणूक आधीच झाली असून तुमच्या व्हर्च्युअल रुममध्ये नवीन बॅकग्राउंड आणि इतर डिटेल्स या अ‍ॅपमधून अ‍ॅड करता य़ेणार आहेत. 

लिबिन यांनी म्हटलं की, लोकांना माहिती देण्यास, सादर करण्यास आणि सहज मनोरंजन करता येणार आहे. अभासी कॅमेऱ्याप्रमाणे हे काम करतं. हे फक्त अ‍ॅप म्हणून डिझाईन केलेलं नाही तर याचा वापर गुगल मीट, झूम आणि युट्युबसोबतही करता येणार आहे. म्हणजेच या प्लॅटफॉर्मचा वापर करताना तुम्हाला व्हर्च्युअल बॅकग्राउंड अ‍ॅड करण्याची सुविधा मिळेल. तसंच स्थिर अ‍ॅनिमेशनही सेट करता येणार आहे. 

हे वाचा - भारताचं पहिलं स्वदेशी सोशल मीडिया अ‍ॅप लॉन्च; जाणून घ्या फीचर्स अन् बरंच काही

व्हर्च्युअल बॅकग्राउंड सपोर्टशिवाय Mmhmm तुम्हाला व्हिडिओ कॉलमध्ये स्लाइड अ‍ॅड करण्याचं फीचर देतं. ज्यापद्धतीनं टीव्ही शोमध्ये स्लाइडशो दिसतो तसंच दृश्य यामुळे दिसेल. तुम्ही ट्रॅकपॅड किंवा लॅपटॉपचा वापर करून तुमची स्लाइड, बॅकग्राउंड किंवा स्क्रीनवर ते सेट करू शकता. लिबिन यांनी एका व्हिडिओमधून सांगितलं की, व्हिडिओमध्ये तुमची विंडो लहान करू शकता किंवा ऑपेसिटी कमी करू शकता. तसंच तुमची विंडोही तुम्ही डिलिट करू शकता. 

Mmhmm मध्ये एअरप्ले सपोर्ट आहे. यामुळे तुमच्या आयफोन स्क्रीनला व्हिडिओ कॉलमध्ये मिरर करता येईल. किंवा तुमचा वेब ब्राउजर व्हर्च्युअल बॅक्रग्राउंडच्या एका बाजुवर घेता येतो. लिबिन यांनी हे सुद्धा सांगितलं आहे की, एक लाइव्ह व्हिडिओ तुमच्या व्हिडिओ कॉलमध्ये दाखवता येतो. लिबिन यांनी या अ‍ॅपला असं विचित्र नाव का दिलं यावरही उत्तर दिलं आहे. तुम्ही जेवण करतानाही याचा उच्चार करू शकता असं हे नाव आहे. 

हे वाचा - ठरलं तर Chrome च्या नव्या अपडेटने अवघ्या दोन तासांनी वाढणार तुमच्या लॅपटॉपची बॅटरी लाइफ

सध्या Mmhmm फक्त mac OS Catalina च्या युजर्ससाठी उपलब्ध आहे. त्यातही याचे बीटा व्हर्जन मिळते. याच्या मोबाइल आणि विंडोज व्हर्जनला येण्यास अजुन काही महिने लागतील. डेव्हलपमेंट टीम डायनॅमिक डेक सध्या याच्या काही खास फीचर्सवर काम करत आहे. लिबिन हे Mmhmm ला फ्रिमियम बिझनेस मॉडेल म्हणून सादर करण्याची तयारी करत आहेत. गुगल, झूम, मायक्रोसॉफ्टसह इतर अनेक अ‍ॅप्समध्ये यातून बॅकग्राउंड अ‍ॅड करता येणार आहे. अद्याप असं फीचर इतर कोणत्याच अ‍ॅपमध्ये नाही. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mmhmm app make better Your Video Calls With Virtual Backgrounds