तब्बल 9 तासानंतर WhatsApp, Facebook Restore

टीम ई-सकाळ
गुरुवार, 4 जुलै 2019

Facebook, Instagram आणि WhatsApp यांसारख्या सोशल मीडिया सर्व्हिस जगभरात काही प्रमाणात डाऊन झाल्या होत्या. त्यामुळे युजर्सना मोठ्या अडचणी येत होत्या.  त्यानंतर आता म्हणजे तब्बल 9 तासानंतर या तीनही सर्व्हिस Restore झाल्या आहेत.

नवी दिल्ली : Facebook, Instagram आणि WhatsApp यांसारख्या सोशल मीडिया सर्व्हिस जगभरात काही प्रमाणात डाऊन झाल्या होत्या. त्यामुळे युजर्सना मोठ्या अडचणी येत होत्या.  त्यानंतर आता म्हणजे तब्बल 9 तासानंतर या तीनही सर्व्हिस Restore झाल्या आहेत.

Facebook, Instagram आणि WhatsApp युजर्सना फोटो, व्हिडिओ डाऊनलोड होत नसल्याच्या अडचणी येत होत्या. त्यामुळे युजर्सकडून संताप व्यक्त केला जात होता. याबाबतच्या तक्रारीही Twitter वरून करण्यात आल्या होत्या. त्यानंतर आता Facebook, Instagram आणि WhatsApp या सर्व्हिस पूर्ववत करण्यात आल्या आहेत. याबाबतची माहिती कंपनीकडून आज (गुरुवार) 4 जुलैला सकाळी साडेपाचच्या सुमारास ट्विट करून देण्यात आली.

काल (बुधवार) रात्री आठच्या सुमारास फेसबुक, व्हॉट्सअॅपवर फोटो, व्हिडिओ पोस्ट करताना अडचणी येत होत्या. तसेच व्हॉट्सअॅपवर येणारे फोटोही डाऊनलोड करता येऊ शकत नव्हत्या. तर कोणाचे स्टेट्सही पाहता येऊ शकत नव्हते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: WhatsApp Facebook Instagram Service have been Restored