WhatsApp Group Safety : व्हॉट्सॲप ग्रुप्स वापरताना 'ही' काळजी घेताय? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

WhatsApp Group Safety

WhatsApp Group Safety : व्हॉट्सॲप ग्रुप्स वापरताना 'ही' काळजी घेताय?

व्हॉट्सॲप ग्रुप्स हे अनेकांसाठी मोठं वरदान आहे. अगदी फॅमिली ग्रुप पासून आपल्या सहकाऱ्यांसोबतकिंवा मित्राच्या वाढदिवसाची पार्टी देण्याची प्लॅन करण्यासाठी व्हॉट्सॲप ग्रुप्सचा खूप फायदेशीर असतो.

व्हॉट्सॲप ग्रुप्सवर तुम्ही बिनधास्त आणि सुरक्षित चॅट हव्या तेवढ्या लोकांसोबत करू शकता पण कधी तुम्हाला असा अनुभव आलाय की तुम्हाला अशा ग्रुप मध्य अॅड करण्यात आले ज्याचा तुमच्याशी काहीही संबंध नाही किंवा एखाद्या ग्रुपमध्ये खोटी माहिती दिली जात आहे. अशावेळी व्हॉट्सॲप ग्रुप्सचा सुरक्षित वापर कसा करायचा, हे समजून घेणे गरजेचे आहे.

चला तर जाणून घेऊया.

1. ब्लॉक ॲन्ड रिपोर्ट: व्हॉट्सॲप मध्ये अगदी सोप्या पध्दतीने तुम्ही अकाऊंट्स ब्लॉक करू शकता. जर तुम्हाला 'कोणत्या व्यक्तीकडून किंवा कोणत्या ग्रुप चॅट वरुन त्रासदायक मेसेज आला असेल तुम्ही सोप्या पध्दतीने त्यांना ब्लॉक करु शकता. आता व्हॉट्सॲपनी अशा लोकांनी पाठवलेला मेसेजची माहिती फॅक्ट चेकर्स किंवा कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या एजन्सीजना पाठवू कते.

2. फॉरवर्ड लिमिट्स : खूप वेळा फॉरवर्ड झालेले मेसेज एका वेळी एकाच चॅटवर पाठवत असल्याने आता व्हॉट्सॲपकडून फॉरवर्ड लिमिट्स करण्यात आली आहे. त्यामुळे आता व्हॉट्सअपवरुन पाठवण्यात आलेल्या अशा मेसेजेसची संख्या ही ७० टक्क्यांनी कमी झाली आहे. आता फॉरवर्ड मेसेजेस केवळ एका ग्रुपवर एकदाच पाठवता येणे शक्य होईल. ही संख्या पूर्वी ५ होती.

3. ग्रुप प्रायव्हसी सेंटिंग्ज : व्हॉट्सॲपवर तुमच्या फोनवर असलेले लोकच तुम्हाला ग्रुप मध्ये अॅड करु शकतात. व्हॉट्सॲप च्या ग्रुप प्रायव्हसी सेटिंग्ज आणि ग्रुप इन्व्हाईट सिस्टममुळे यूजर्सला हे ठरवता येते की तुम्हाला ग्रुप मध्ये कोण ॲड करु शकेल. तुमच्या परवानगीशिवाय कोणालाही तुम्हाला ग्रुप मध्ये ॲड करु देऊ नका. ही निवड करण्याकरता तुमच्या कडे तीन पर्याय उपलब्ध असतील.

4. ॲडमिनचे कंट्रोल असणे - साधारणपणे डिफॉल्ट सेटिंग्ज नुसार ग्रुप मधील कोणताही सहभागी व्यक्ती मेसेज पाठवू शकतात आणि ग्रुपची माहिती बदलणे, ग्रुपचा विषय, आयकॉन किंवा डिस्क्रीप्शन बदलू शकतात. पण आता व्हॉट्सॲप सेटिंग्ज मुळे आता ॲडमिनिस्ट्रेटर्स हे ग्रुप मध्ये कोणी मेसेज पाठवायचा ते ठरवू शकतात.

5. व्हॉट्सॲप वरील माहिती फॅक्टचेक करणे : भारतात १० हून अधिक स्वतंत्र फॅक्ट चेकिंग संस्था आहेत ज्या व्हॉट्सॲप यूजर्सला माहिती फॅक्ट चेक करण्यास मदत करतात.

व्हॉट्सॲप ही मार्केटमधील आघाडीची एन्ड-टू-एन्ड एन्क्रिप्टेड मेसेंजिंग सेवा असून व्हॉट्सॲपनी नेहमीच ऑनलाईन सुरक्षा आणि चुकीच्या माहितीपासून यूजर्सला सुरक्षित ठेवण्याचा प्रयत्न केलाय.

टॅग्स :Technologywhatsapp