व्हॉट्‌सऍपचे ग्रुप व्हिडिओ कॉलिंग ही फसवेगिरी 

वृत्तसंस्था
सोमवार, 21 नोव्हेंबर 2016

नवी दिल्ली : व्हॉट्‌सऍपने नुकतेच व्हिडिओ कॉलिंग हे फीचर युजर्सना उपलब्ध करून दिले असून, याद्वारे विंडोज आणि ऍण्ड्राईड व्हॉट्‌सऍप युजर्सना थेट दृकश्राव्य माध्यमातून संवाद साधता येत आहे. व्हॉट्‌सऍप अपडेट केल्यानंतर नव्या व्हर्जनमध्ये ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. मात्र काही युजर्सना आता ग्रुप व्हिडिओ कॉलिंगसाठी लिंक्‍स येत असून, त्यावर क्‍लिक केल्यानंतर युजर्सची माहिती हॅक करण्याचा प्रयत्न होत आहे. 

समाजविघातक शक्तींकडून यासाठीच्या लिंक्‍स युजर्सना पाठविल्या जात असून, या लिंकवर क्‍लिक केल्यानंतर युजर्सना त्यांच्या कॉन्टॅक्‍टमधील युजर्सनाही यासाठी आमंत्रित करण्यास सांगितले जात आहे; तसेच या लिंकवर क्‍लिक केल्यानंतर आपली सर्व वैयक्तिक माहिती आणि अन्य तपशील गोळा केला जात आहे. यामध्ये कॉन्टॅक्‍टसोबत ई-मेल्स आणि अन्य गोष्टीही हॅक केल्या जाण्याची शक्‍यता वर्तविण्यात आली आहे. 

या लिंकवर क्‍लिक केल्यानंतर उघडणारे संकेतस्थळ हे हुबेहुब व्हॉट्‌सऍपच्या रंगसंगतीतील असल्याने अनेकांची फसवणूक होत आहे; परंतु असे कोणतीही फीचर व्हॉट्‌सऍपने अद्याप जाहीर केलेले नसून लोकांनी या बनावाला बळी पडू नये, असे आवाहन करण्यात आले आहे. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: whatsapp group video calling deceiving