WhatsApp ने कोरोना जनजागृतीसाठी लॉन्च केला स्टिकर्स पॅक, जाणून घ्य सविस्तर

whatsapp introduced covid 19 sticker pack know what is special in it Marathi article
whatsapp introduced covid 19 sticker pack know what is special in it Marathi article

इन्स्टंट मेसेजिंग अ‍ॅप व्हॉट्सअ‍ॅपकडून कोणत्याही खास सणाच्या निमित्ताने स्टिकर पॅक ऑफर देण्यात येते, परंतु या वेळी कोरोना विषाणूच्या साथीबद्दल जनजागृती करण्यासाठी कंपनीने स्टिकर पॅक लॉन्च केला आहे. 'स्टिकर्स फॉर ऑल' नावाच्या या स्टिकर पॅकमध्ये 23 स्टिकर्स देण्यात आले आहेत. ते डब्ल्यूएचओ द्वारा डिझाइन केलेले आहेत. हे आयओएस आणि अँड्रॉइड या दोन्ही वापरकर्त्यांसाठी उपलब्ध आहेत.

लोक एकमेकांशी जोडले जातील

कंपनीने दिलेल्या एका निवेदनात म्हटले आहे की, "व्हॉट्सअ‍ॅप डब्ल्यूएचओच्या सहकार्याने Vaccines for All नावाचा एक स्टिकर पॅक लॉन्च करत आहे. आम्हाला आशा आहे की या स्टिकर्सद्वारे लोक एकमेकांशी जोडले जातील. आपण आनंद, उत्साह आणि कोविडची लस उपलब्ध झाल्याचा आनंद आणि  तुमचे एकंदरीत विचार शेयर करु शकाल. या कठीण काळात लोकांचे जीव  वाचवण्यासाठी राबत असलेल्या हेल्थ केअर हिरोज  आदर दाखवण्यासाठी या स्टिकर्सचा वापर कराल "

व्हॉट्सअ‍ॅपवरुन दिली जातेय माहिती

बऱ्याच देशांमध्ये कोविड -19 लसीकरणाची व्हॉट्सअ‍ॅपवर नोंदणी करण्याची मोहीम सुरू करण्यात आली आहे. भारतात व्हाट्सएपने WhatsApp ने MyGov आणि Reliance च्या   मालकीच्या AI प्लॅटफॉर्म Haptik बरोबर भागीदारी केली आहे. ज्याद्वारे कोविड 19 शी संबंधित अचूक माहिती भारतीयांना उपलब्ध करुन देण्यात आली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com