Whatsapp New Feature : व्हॉट्सअ‍ॅपमध्ये भन्नाट फीचरची एंट्री; कसं वापरायचं? एकदा बघाच

Whatsapp Translation Feature : व्हॉट्सअ‍ॅपने अँड्रॉइड युजर्ससाठी चॅट मेसेजचं थेट भाषांतर करण्याची सुविधा आणली आहे.
Whatsapp Translation Feature
Whatsapp Translation Featureesakal
Updated on

Whatsapp Translate Feature : व्हॉट्सअ‍ॅप आपल्या युजर्ससाठी आणखी एक उपयुक्त आणि बहुभाषिक सुविधा घेऊन आलं आहे. अ‍ॅन्ड्रॉइड वापरकर्त्यांसाठी चॅटमधील मेसेज थेट अ‍ॅपमध्येच भाषांतर करता येईल, असा नवा फिचर व्हॉट्सअ‍ॅपने बीटा अपडेटद्वारे सुरु केला आहे. व्हर्जन 2.25.12.25 मध्ये ही सुविधा उपलब्ध झाली असून सध्या काही निवडक युजर्सना ती वापरता येत आहे.

काय आहे या नव्या फिचरचं वैशिष्ट्य?

या फिचरमुळे वापरकर्ते आपल्या चॅटमध्ये येणाऱ्या मेसेजचं भाषांतर लगेच करू शकतात. विशेष म्हणजे, या अनुवादासाठी इंटरनेटची गरज लागत नाही कारण संपूर्ण प्रक्रिया फोनमध्येच होते. यामुळे युजर्सचा डेटा पूर्णपणे सुरक्षित राहतो आणि कोणत्याही बाहेरच्या सर्व्हरवर माहिती पाठवली जात नाही.

कशा प्रकारे वापरता येणार भाषांतर फिचर?

  • चॅटच्या "Chat Info" स्क्रीनमध्ये जाऊन युजर्सना भाषा पॅक डाउनलोड करता येतो.

  • एकदा पॅक इन्स्टॉल केल्यावर तुम्ही हिंदी, स्पॅनिश, अरबी, रशियन, ब्राझिलियन पोर्तुगीज यांसारख्या भाषांमध्ये भाषांतर करू शकता.

  • ग्रुप चॅटमध्ये अनेक भाषा वापरल्या जात असतील, तर व्हॉट्सअ‍ॅप ऑटो डिटेक्ट लँग्वेज पॅक देखील उपलब्ध करून देत आहे.

  • प्रत्येक चॅटसाठी स्वतंत्र अनुवाद सेटिंग्ज करता येतात.

Whatsapp Translation Feature
Gmail Scam : एक ईमेल अन् मिनिटांत बँक अकाऊंट रिकामं! काय आहे हा Gmail फ्रॉड? आत्ताच जाणून घ्या नाहीतर होईल मोठे नुकसान

गोपनीयता आणि नियंत्रणावर भर

  • ट्रान्सलेशन पूर्णतः ऑन-डिव्हाईस होते, त्यामुळे एन्ड-टू-एन्ड एनक्रिप्शन कायम राहतं.

  • युजर्सना स्वतःहून एखादा मेसेज निवडून ‘Translate’ पर्याय वापरता येतो किंवा संपूर्ण चॅटसाठी ऑटो ट्रान्सलेशन चालू करता येतं.

  • फीडबॅक देणं पर्यायी आहे आणि त्यादरम्यानही कुठलाही मेसेज Meta कडे जात नाही.

जर तुम्ही काही भाषा वापरणं बंद केलं असेल तर व्हॉट्सअ‍ॅपच्या Storage Settings मधून लॅंगवेज पॅक डिलीटही करता येतात. यामुळे फोनमधील जागा मोकळी ठेवणंही शक्य होतं.

Whatsapp Translation Feature
AC Safety Tips : उन्हाळ्यात दिवसरात्र AC सुरू ठेवताय? आरोग्यावर घातक परिणाम होण्याआधी 'या' 5 सवयी बदला अन् वीजही वाचवा

ही सुविधा सध्या फक्त Google Play Store वरून बीटा अपडेट करणाऱ्या निवडक युजर्सना मिळाली आहे. मात्र पुढील काही आठवड्यांत हे फिचर सर्व अ‍ॅन्ड्रॉइड युजर्ससाठी उपलब्ध होईल, असं व्हॉट्सअ‍ॅपकडून सांगण्यात आलं आहे. भविष्यात आणखी भाषा जोडण्याचंही नियोजन आहे.

तर बहुभाषिक संवाद आता आणखी सहज होईल! व्हॉट्सअ‍ॅपच्या या नव्या फिचरमुळे वेगवेगळ्या भाषांमध्ये बोलणाऱ्या व्यक्तींसोबत संवाद साधणं आता खूपच सोपं आणि सुरक्षित होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com