Whatsapp New Features : व्हॉट्सअ‍ॅप युजर्ससाठी खुशखबर! अपडेटमध्ये आणखी 3 नव्या फीचर्सची एंट्री, पाहा एका क्लिकवर

Whatsapp Calls Chat Channel New Features : व्हॉट्सअ‍ॅपने चॅट, कॉल्स आणि चॅनेल्ससाठी नवीन स्मार्ट फीचर्स आणले असून, यामुळे वापरकर्त्यांचा अनुभव स्मार्ट आणि आकर्षक होणार आहे. हे फीचर्स कसे वापरायचे जाणून घ्या सविस्तर..
Whatsapp Calls Chat Channel New Features
Whatsapp Calls Chat Channel New Featuresesakal
Updated on

Whatsapp Latest Features : व्हॉट्सअ‍ॅप वापरणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. Meta मालकीच्या व्हॉट्सअ‍ॅपने नुकतेच नवीन अपडेट्सची घोषणा केली असून, यामुळे चॅटिंग, कॉलिंग आणि चॅनेल्सचं व्यवस्थापन अधिक सहज, स्मार्ट आणि आकर्षक होणार आहे. या अपडेट्समुळे वापरकर्त्यांचा अनुभव आणखी जास्त चांगला, सुधारणार आहे.

ग्रुप चॅट आणि पर्सनल चॅट्स झाले ‘स्मार्ट’

  • लाईव्ह ऑनलाईन इंडिकेटर: आता ग्रुप चॅटमध्ये कोण-कोण सदस्य ऑनलाईन आहेत, हे रिअल-टाईममध्ये पाहता येणार आहे. त्यामुळे कोणाशी बोलायचं हे ठरवणं आता सोपं झालंय.

  • स्मार्ट नोटिफिकेशन सेटिंग: ‘Notify for Highlights’ फीचरमुळे आता फक्त तुमच्या saved contacts कडून आलेल्या reply, mention किंवा मेसेजसाठीच नोटिफिकेशन मिळणार.

  • इव्हेंट्स तयार करा: आता One-on-One चॅटमध्येही इव्हेंट तयार करता येतील. RSVP पर्याय (Yes, No, Maybe), प्लस-वन अ‍ॅड करणं, End Time सेट करणं आणि इव्हेंट पिन करणे अशा सुविधा यात आहेत.

  • Emoji reactions : मजकूर न टाईप करताच कोणत्याही इमोजीवर टॅप करून लगेचच प्रतिक्रिया देता येईल.

  • iPhone साठी डॉक्युमेंट स्कॅनिंग: iOS वापरकर्त्यांना आता व्हॉट्सअ‍ॅपवरून थेट डॉक्युमेंट स्कॅन, क्रॉप आणि शेअर करता येतील.

  • Default Messaging App: iPhone वापरकर्ते आता व्हॉट्सअ‍ॅपला त्यांच्या डिफॉल्ट मेसेजिंग आणि कॉलिंग अ‍ॅप म्हणून सेट करू शकतात.

Whatsapp Calls Chat Channel New Features
ChatGPT Aadhaar : अलर्ट! AI वापरुन बनवले जात आहेत बनावट आधार कार्ड, तुमचे ID डॉक्युमेंट कसे ठेवाल सुरक्षित? जाणून घ्या सोपी ट्रिक

कॉलिंग अनुभव आणखी उत्तम

  • Pinch-to-Zoom सपोर्ट: व्हिडीओ कॉल दरम्यान स्क्रीनवर झूम इन करण्याचा पर्याय आता उपलब्ध असेल.

  • Quick Add Participants: चालू कॉलमध्ये थेट चॅट विंडोपासून नवीन व्यक्तींना कॉलमध्ये अॅड करता येणार आहे.

  • उत्तम कॉल क्वालिटी: सुधारित बँडविड्थ डिटेक्शनमुळे कॉल ड्रॉप होण्याची शक्यता कमी आणि HD व्हिडीओ कॉलमध्ये अपग्रेड होणार आहे.

Whatsapp Calls Chat Channel New Features
Bike Launch March 2025 : बाईक प्रेमींसाठी मार्च महिना एकदम खास! लाँच होणार 'या' 5 बाईक अन् स्कूटर; किंमत, फीचर्स पाहा एका क्लिकवर

चॅनेल अ‍ॅडमिन्ससाठी खास टूल्स

  • व्हॉइस मेसेज ट्रान्सक्रिप्ट: आता व्हॉइस मेसेज ऐकण्याऐवजी त्याचं मजकूर रूपांतरण थेट वाचता येईल.

  • QR कोड शेअरिंग: चॅनेलसाठी युनिक QR कोड तयार करता येईल, ज्यामुळे नवीन सदस्य अॅड होणं आणखी सोपं होईल.

  • फास्ट अपडेट्स: नवीन टूल्समुळे अ‍ॅडमिन्सना अपडेट्स अधिक वेगाने आणि प्रभावीपणे पाठवता येणार आहे.

व्हॉट्सअ‍ॅपने पुन्हा एकदा सिद्ध केलंय की ते केवळ मेसेजिंग अ‍ॅप नाही, तर एक परिपूर्ण संवाद माध्यम बनत चाललंय. जे वैयक्तिक संवाद, व्यावसायिक वापर यासाठी तितकंच महत्त्वाचं आहे. चला तर मग, तुमचं व्हॉट्सअ‍ॅप अपडेट झालं का चेक करा आणि हे भन्नाट फीचर्स वापरा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com