WhatsApp Features : आता व्हॉट्सॲप Status वर वॉईस रेकॉर्डींग पोस्ट करता येणार; वाचा आणखी नवीन फिचर्स

याविषयी व्हॉट्सॲपकडून अधिकृत माहिती देण्यात आली आहे.
WhatsApp Features
WhatsApp Featuressakal

नवी दिल्ली: व्हॉट्सॲप हा प्रत्येकाच्या आयुष्याचा महत्त्वाचा भाग आहे. व्हॉट्सॲपच्या मदतीने तुम्ही मित्र आणि जवळच्या व्यक्तीशी मेसेज, कॉल सोबतच व्हिडीओ कॉल वर संपर्क साधू शकता. याशिवाय छोट्या मोठ्या अपडेट्ससाठी स्टेटस हा लोकप्रिय मार्ग आहे. हे स्टेटस २४ तासांत अदृश्यही होतात. या स्टेटसमध्ये आपण फोटो, व्हिडिओ, GIF, मजकूर आणि बरेच काही समाविष्ट असू शकतो.

आता व्हॉट्सॲपने स्टेटससंबंधीत नवीन फिचर्स आणले आहेत. याविषयी व्हॉट्सॲपकडून अधिकृत माहिती देण्यात आली आहे. (WhatsApp launch a handful of new features about status update read story )

स्टेटस प्रायवसी

तुम्ही शेअर केलेलं स्टेटस हे तुमच्या कॉन्टॅक्टमधील सर्वांसाठी असेल, असे गरजेचे नाही त्यामुळे सेटींगद्वारे तुम्ही तुमचे स्टेटस कोणाला दाखवायचे आणि कोणाला दाखवायचे नाही, हे ठरवू शकता.

वॉइस स्टेटस

व्हॉट्सॲपने आता आणखी एक नवीन फिचर्स आणत स्टेटसवर ३० सेकंदांपर्यंत वॉइस मेसेज रेकॉर्ड आणि शेअर करता येणार आहे. या व्हॉइस स्टेटसच्या मदतीने तुम्हाला टाईप करण्याऐवजी बोलून व्यक्त करणे अधिक सोपी जाणार.

WhatsApp Features
Whatsapp News : सुप्रीम कोर्टाने व्हाट्सअपला फटकारलं; भारतीय युजर्सना खरी माहिती देण्याचे निर्देश

स्टेटस रिॲक्शन

पोस्ट केलेल्या स्टेटस अपडेट्सला जलद गतीने आणि सोप्या पद्धतीने रिॲक्ट करण्यासाठी युजर्सला आठ इमोजी देण्यात आले आहे. या इमोजीवर स्वाइप करुन आणि टॅप करुन तुम्ही कोणत्याही स्टेटसला पटकन उत्तर देऊ शकता.

लिंक प्रिव्ह्यू

जर तुम्ही स्टेटसवर कोणती लिंक पोस्ट केली तर तुम्हाला त्या लिंक रिलेटेड व्हिजुअल प्रिव्ह्यू दिसेल. लिंक प्रिव्ह्यूमुळे तुमचं स्टेटस अधिक चांगले दिसणार. या शिवाय तुमच्या कॉन्टॅक्टमधील लोकांना लिंक क्लिक करण्यापूर्वी लिंक काय आहे, याची कल्पना येणार.

नवीन स्टेटसची प्रोफाइल रिंग

प्रोफाइल रिंगमुळे तुम्ही एखाद्या प्रिय व्यक्तीचे स्टेटस कधीही चुकवणार नाही. जेव्हा जेव्हा ते स्टेटस अपडेट शेअर करतील तेव्हा प्रत्येकवेळी तुम्हाला त्यांच्या प्रोफाइल फोटोभोवती रिंग दिसेल. जर तुम्ही त्या रिंग वर क्लिक कराल कर तुम्ही थेट त्याचे स्टेटस पाहू शकाल.

WhatsApp Features
WhatsApp Status पाहिला, पण कोणाला कानोकान खबर नाही? शक्य आहे...ही आयडिया ट्राय करा

ही फिचर्स जागतिक स्तरावर युजर्ससाठी रोल आउट झाली आहेत आणि येत्या आठवड्यात प्रत्येकाच्या मोबाईमध्ये हे फिचर्स दिसून येणार. व्हॉट्सॲपचे युजर्स लवकरच या फिचर्सचा आनंद घेणार.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com