Silent Unknown Calls WhatsApp
Silent Unknown Calls WhatsAppeSakal

WhatsApp New Feature : अनोळखी नंबरवरुन येणाऱ्या कॉल्सचा त्रास होणार बंद; व्हॉट्सअ‍ॅपने लाँच केलं नवीन फीचर

व्हॉट्सअ‍ॅपने आपल्या यूजर्ससाठी एक नवीन फीचर लाँच केलं आहे.
Published on

व्हॉट्सअ‍ॅपवर आजकाल स्पॅम कॉल्सचं प्रमाण भरपूर वाढलं आहे. यामुळे कित्येक लोक फसवणुकीलाही बळी पडत आहेत. व्हॉट्सअ‍ॅपवर व्हिडिओ कॉल करून, सेक्स्टॉर्शनला बळी पाडण्याचं प्रमाणही सध्या वाढलं आहे. अशा अनोळखी नंबरवरुन येणाऱ्या कॉलमुळे होणारा त्रास आता बंद होणार आहे.

व्हॉट्सअ‍ॅपने आपल्या यूजर्ससाठी एक नवीन फीचर लाँच केलं आहे. याच्या मदतीने येणारे स्पॅम किंवा अनोळखी कॉल्स तुम्हाला सायलेंट करता येणार आहेत. काही दिवसांपूर्वी हे फीचर व्हॉट्सअ‍ॅपच्या केवळ बीटा व्हर्जनवर उपलब्ध होते. मात्र, आता कंपनीने आपल्या सर्व अँड्रॉईड आणि अ‍ॅपल यूजर्ससाठी हे फीचर लाँच केलं आहे.

Silent Unknown Calls WhatsApp
WhatsApp DP : आता व्हॉट्सअ‍ॅपचा प्रोफाईल फोटो बदलला तरी होऊ शकते कारवाई? खबरदारी घेण्याचं तज्ज्ञांचं आवाहन

अशी करा सेटिंग

हे फीचर सुरू करण्यासाठी तुम्हाला सगळ्यात आधी व्हॉट्सअ‍ॅप उघडावे लागेल. यानंतर सेटिंग्समध्ये जाऊन प्रायव्हसी या पर्यायावर क्लिक करा. यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला कॉल्स हा ऑप्शन दिसेल. कॉल्स पर्यायावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला Silence Unknown Calls हा पर्याय दिसेल. यावर क्लिक करून तुम्ही अनोळखी कॉल बंद करू शकता.

WhatsApp New Feature
WhatsApp New FeatureeSakal

सायलेंट अननोन कॉल्स हा पर्याय बाय डिफॉल्ट बंद असणार आहे. त्यामुळे तुम्हाला सेटिंग्समध्ये जाऊन हा पर्याय सुरू करावा लागेल. यानंतर तुम्हाला अनोळखी नंबरवरुन येणारे सर्व कॉल्स सायलेंट राहतील. त्यामुळे तुम्हाला विनाकारण होणारा त्रास बंद होणार आहे.

Silent Unknown Calls WhatsApp
WhatsApp Channels : आता व्हॉट्सअ‍ॅपवर सुरू करता येणार स्वतःचं चॅनल; नवीन फीचर लाँच

अ‍ॅप करा अपडेट

हे फीचर वापरण्यासाठी तुमचं व्हॉट्सअ‍ॅप अपडेट असायला हवं. त्यामुळे तुम्हाला जर सेटिंग्समध्ये हा पर्याय दिसत नसेल, तर तुमचं व्हॉट्सअ‍ॅप अपडेट आहे की नाही हे तपासून घ्या. व्हॉट्सअ‍ॅपचं लेटेस्ट व्हर्जन इन्स्टॉल केल्यानंतर तुम्ही हे फीचर वापरू शकाल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com