इलॉन मस्क ट्वीटरचं रुपडंच पलवटवणार; लवकरच येणार WhatsApp सारखं फीचर | Twitter Update In Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Twitter Update : इलॉन मस्क ट्वीटरचं रुपडंच पलटवणार; लवकरच येणार WhatsApp सारखं फीचर

Twitter Update : इलॉन मस्क ट्वीटरचं रुपडंच पलटवणार; लवकरच येणार WhatsApp सारखं फीचर

Twitter Latest News In Marathi : इलॉन मस्कच्या एंट्रीनंतर ट्विटरमध्ये अनेक मोठे बदल केले जात असूून, काही दिवासांपूर्वी मस्कने मोठी कर्मचारी कपात करत हजारो कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करण्याचा निर्णय घेतला.

हेही वाचा : Gautami Patil Lavani: गौतमीची लावणी कुठे चुकतेय?

आता या फीचरवर तुम्हाला व्हॉट्सअ‍ॅप आणि सिग्नल सारखी सुविधा मिळणार आहे. यासाठी कंपनी एंड-टू-एंड एन्क्रिप्शनच्या फीचर्सची चाचणी करत आहे. सध्या या फीचरची अँड्रॉईड यूजर्ससाठी चाचणी सुरू आहे, अशी माहिती अ‍ॅपचे संशोधक जेन मंचुन वोंग यांनी ट्विट करून दिली आहे.

मंचुन यांनी सांगितले की, ट्विटर एंड-टू-एंड एनक्रिप्टेडचे फीचर डायरेक्ट मेसेजचे फीचर परत आणत आहे. याबाबत मस्कने केलेल्या पोस्टसोबत कोड स्ट्रिंगचा फोटोदेखील जोडला आहे, ज्यामध्ये एनक्रिप्शन की ला हायलाइट करण्यात आले आहे.

हेही वाचा: Twitter Blue या दिवशी होणार रिलाँच; ब्लू टिकसाठी नव्या जुन्या सर्व यूजर्सना मोजावे लागतील पैसे...

मंजुन यांच्या ट्वीटला मस्कचे उत्तर

दरम्यान, इलॉन मस्क यांनीही जेन मंचुन वोंग यांच्या ट्विटला उत्तर दिले आहे. मस्कच्या उत्तरानंतर कंपनी या फीचरवर काम करत असल्याच्या वृत्ताला दुजोरा मिळाला आहे. याशिवाय कंपनी इतरही अनेक फीचरवर काम करत आहे.