Twitter Blue या दिवशी होणार रिलाँच; ब्लू टिकसाठी नव्या जुन्या सर्व यूजर्सना मोजावे लागतील पैसे... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Twitter Blue

Twitter Blue या दिवशी होणार रिलाँच; ब्लू टिकसाठी नव्या जुन्या सर्व यूजर्सना मोजावे लागतील पैसे...

Elon Musk: ट्विटर विकत घेतल्यापासनं इलॉन सतत त्यात नवनवे बदल आणताना दिसतोय. कंपनीने अलीकडेच ट्विटर ब्लू सबस्क्रिप्शन फिचर लाँच केलं होतं. यात यूजर्स 7.99 डॉलर एवढा चार्ज देऊन ब्लू टिक आणि अन्य फिचर मिळवू शकत होते. मात्र याचा गैरफायदा घेत अनेक फेक यूजर्सनेही त्यांचे ट्विटर अकाऊंट व्हेरिफाय केलेत. त्यानंतर हे फिचर बंद करण्यात आले. आता कंपनी नव्याने हे फिचर लाँच करण्याच्या तयारीत आहे.

२९ नोव्हेंबरला नव्याने या फिचरची घोषणा करण्यात येणार आहे. या दिवशी हे ट्विटर ब्लू हे फिचर रिलाँच होणार असल्याची माहिती इलॉन मस्कने ट्विट करत दिली आहे. तसेच ट्विटर ब्लू बाबत इलॉनने महत्वाची माहिती दिली आहे. कंनफर्मेशन मिळेपर्यंत व्हेरिफाइड नाव बदलल्यास ब्लू टिक हटवण्यात येईल अशी माहिती त्याने दिली. कंपनीने मोठ्या प्रमाणावर कर्मचाऱ्यांना नारळ दिल्याने त्यांच्या वर्कफोर्समध्ये कमतरता जाणवण्याचीही शक्यता दिसून येते.

हेही वाचा: Gautami Patil Lavani: गौतमीची लावणी कुठे चुकतेय?

जुन्या व्हेरिफाइड अकाउंटलाही द्यावे लागतील पैसे

मस्कने त्याच्या ट्विटवर रिप्लाय देत म्हटलंय की, सगळे अपडेट लीगसी ब्लू चेकमार्क काही महिन्यांसाठी हटवण्यात येईल. म्हणजेच जे अकाउंट्स ब्लू टिक व्हेरिफाइड आहेत त्यांना ते पुढे कंटीन्यू ठेवण्यासाठी सबस्क्रिप्शन प्लान घ्यावाच लागेल.

ट्विटर कंपनी ब्लू टिक फिचर नव्याने लाँच करत असून या फिचरचा चार्ज 719 रुपये असू शकतो. मात्र या चार्जमध्ये बदलही होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.