Alert! व्हॉट्सअ‍ॅपवर अ‍ॅमेझॉनच्या ऑफरचा मेसेज आला असेल तर....

Alert! व्हॉट्सअ‍ॅपवर अ‍ॅमेझॉनच्या ऑफरचा मेसेज आला असेल तर....

अ‍ॅमेझॉन आपल्या 30 व्या वर्धापनदिनानिमित्त मोफत भेटवस्तू देत असल्याचा एक मेसेज सध्या व्हॉट्सअॅपवर फिरत आहे. अनेकजणांनी अॅमेझॉनच्या नावानं फिरणाऱ्या या लिंकवर क्लिक करत आपली वैयक्तिक माहिती भरल्याचा प्रकारही घडला आहे. पण असा मेसेज तुम्हालाही आला असेल तर सावधान. कारण अमेझॉन कंपनीकडून असा कोणताही मेसेज पाठवला जात नाही. अॅमेझॉन कंपनीनं तशी घोषणाही अद्याप केलेली नाही. त्यामुळे फुटकच्या भूलथाप्पांना किंवा मेसजला बळी पडून आपली वैयक्तिक माहिती देऊ नका. तुम्ही याला बळी पडलात तर मोठी किंमत मोजावी लागेल.

अॅमेझॉनच्या नावानं फिरणाऱ्या या बनावट व्हॉट्सअ‍ॅप मेसेजचे अनेकजण शिकारही झाले आहेत. व्हायरल मेसेजमध्ये अ‍ॅमेझॉन आपल्या 30 व्या वर्धापनदिनानिमित्त विशेष भेट म्हणून स्मार्टफोन देऊ करत आहे. असा मेसेज व्हॉट्सअपवर फिरत आहे.  अनेक यूजर्सला हा मेसेज मिळाला आहे. www.amazon.com वर प्रत्येकासाठी एक मोफत भेट आहे, अशा मेसेजमुळे नेटकरीही आनंदी होऊन लिंकवर क्लिक करतायेत. पण याबद्दल एक धक्कादायक सत्य समोर आलं आहे.  

https://lucktime.xyz/amazonhz/tb.php?v=ss1616577 ही लिंक व्हॉट्सअॅपवर सध्या फिरत आहे. या लिंकवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला  “अभिनंदन, आमच्या सर्वेक्षणात भाग घेण्यासाठी आपली निवड झाली आहे. ‘आजच्या मोफत भेटमध्ये तुम्हाला मिळणार आहे Huawei Mate 40 Pro 5G Full Netcom 8GB +’ . दर दिवशी आम्ही याप्रमाणे 100 वापरकर्ते निवडतो आणि त्यांना आश्चर्यकारक बक्षिसे जिंकण्याची संधी देतो. या सर्वेक्षणचा हेतू आमच्या वापरकर्त्यांचा आहे. माहिती भरण्यासाठी तुम्हाला फक्त ४ मिनिटांचा कालावधी दिला जातो. त्यामुळे अनेकजण पॅनिक होऊन लगेच क्लिक करातात. आणि विचारलेल्या प्रश्नांची उत्तरेही देतात. यामध्ये लिंग, वय, अ‍ॅमेझॉन सर्व्हिस क्वालिटी आणि ती व्यक्ती वापरत असलेले स्मार्टफोन प्लॅटफॉर्म असे चार प्रश्न आहेत. ही माहिती दिल्यानंतर, वापरकर्त्यांना मोफत भेट घेण्यासाठी एक बॉक्स उघडावा लागेल. ज्यानंतर त्याला हा संदेश पाच व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप किंवा इतर 20 मित्रांसह शेअर करण्यास सांगितले जाते.

तज्ज्ञांच्या मते, अॅमेझॉनच्या नावानं फिरणारा हा मेसेज बनावट आहे. अशा मेसेजद्वारे सायबर गुन्हेगार आपली वैयक्तिक माहिती शोधू शकतात. तसेच आपल्याला फोन करण्यासाठी किंवा फसवणूक करण्यासाठी, ओळख चोरीसाठी आपला डेटा वापरू शकतात. त्यामुळे अशापद्धतीचे मेसेज आल्यास त्याची आधी खात्री करा. कारण याबद्दल अद्याप अ‍ॅमेझॉनने कोणतीही माहिती दिलेली नाही. त्यांच्या संकेतस्थळावही यासंबंधी कोणतीही जाहिरात अथवा माहिती नाही.

- अर्थविश्वातील बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

मोफत वस्तू मिळेल, त्यामुळे अशा बनावट मेसेजला अनेकजण बळी पडतात. तुम्हाला अशाप्रकराचा मेसेज आल्यास क्लिक करण्यापूर्वी पडताळून पाहा. अशे बनावट मेसेज पसरवणारे सायबर गुन्हेगारांचं जाळे असू शकते. हॅकर्स आपला फोन किंवा कंम्प्यूटर हॅक करण्यासाठी याचा वापर करू शकतात.   

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com