पॅन कार्डला आधारशी जोडा नाहीतर, १ हजार रुपयांचा दंड!

Aadhaar_PAN_Link
Aadhaar_PAN_Link

नवी दिल्ली : जर तुम्ही अजूनही तुमचं पॅन कार्ड (Permanent Account Number) तुमच्या आधार कार्डशी (Aadhaar Card) लिंक केलं नसेल, तर ते लवकर लिंक करून घ्या. पॅन आधारशी लिंक करण्यासाठी ३१ मार्च २०२१पर्यंत मुदत देण्यात आली आहे. जर तुम्ही आधार लिंक केलं नसेल तर तुम्हाला १ हजार रुपयांपर्यंत दंडही आकारला जाऊ शकतो. 

यापूर्वी, केंद्र सरकारने पॅन कार्ड आधारशी जोडण्यासाठी अनेकवेळा मुदत वाढवली आहे, पण आता तसे न केल्यास दंड आकारण्याची तरतूद केली गेली आहे. तसेच कार्डधारकाचा पॅन क्रमांकदेखील अवैध ठरवला जाणार आहे.

दरम्यान, मंगळवारी (ता.२३) लोकसभेत वित्त विधेयक २०२१ संमत करण्यात आले. ज्यामध्ये आयकर कायदा (Income Tax Act), १९६१मधील नवीन कलम २३४एच च्या अंतर्गत नवीन तरतूद करण्यात आली आहे. पॅन कार्डशी आधार नसल्यास, नागरिकांना आता जास्तीत जास्त १,००० रुपयांपर्यंत दंड भरावा लागेल. या व्यतिरिक्त नागरिकांचे पॅन कार्ड अवैध ठरवल्यानंतर ज्या अडचणी निर्माण होतील, त्याला ते स्वत: जबाबदार असतील.

इकडे लक्ष द्या
आयकर कायदा कलम १३९एए (२) मध्ये असे स्पष्ट म्हटले आहे की, १ जुलै २०१७ रोजी पॅनकार्ड धारक प्रत्येक व्यक्ती ही आधार कार्ड बनविण्या योग्य आहे, त्यांना पॅन कार्ड आधारशी लिंक करून घ्यावे लागेल. त्याचबरोबर ज्यांच्याकडे आधार कार्ड आहे, त्यांनी त्यांचा आधार क्रमांक इन्कम टॅक्स अधिकाऱ्यांकडे द्यावा. रिटर्न फाइल आणि पॅन अलॉटमेंट फॉर्ममध्ये आधार कार्ड क्रमांक देणे बंधनकारक करण्यात आले आहे.

- अर्थविश्वातील बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com