Motorola Edge 50 Discount : खुशखबर! Motorola Edge 50 मिळतोय चक्क 11 हजार रुपयांत; इथे सुरुय जबरदस्त ऑफर, पाहा एका क्लिकवर

Flipkart Sale Motorola Edge 50 Discount Offer : फ्लिपकार्टच्या Sasa Lele सेलमध्ये Motorola Edge 50 फक्त 11 हजार रुपायांमध्ये उपलब्ध आहे.
Flipkart Sale Motorola Edge 50 Discount Offer
Flipkart Sale Motorola Edge 50 Discount Offeresakal
Updated on

Motorola Edge 50 Discount Offer : भारतात नुकतीच Motorola Edge 60 सिरीज लाँच झाल्यानंतर, Motorola च्या Edge 50 स्मार्टफोनवर फ्लिपकार्टकडून मोठा डिस्काउंट जाहीर करण्यात आला आहे. फ्लिपकार्टने आपल्या लोकप्रिय Sasa Lele सेलची मुदत 10 मे 2025 पर्यंत वाढवली असून यामध्ये ग्राहकांना स्मार्टफोनसह विविध इलेक्ट्रॉनिक वस्तूंवर आकर्षक ऑफर्सचा लाभ घेता येणार आहे.

Motorola Edge 50 फक्त 11 हजारमध्ये!

Motorola Edge 50 (256GB व्हेरिएंट) ची मूळ किंमत 32,999 रुपये इतकी आहे. मात्र, Flipkart Sasa Lele Sale अंतर्गत या फोनवर थेट 11,000 रुपयेची सवलत देण्यात आली आहे. त्यामुळे फोनची किंमत आता फक्त 21,999 रुपये झाली आहे. याशिवाय Flipkart कडून जुन्या स्मार्टफोनच्या एक्स्चेंजवर 20,050 रुपयेपर्यंतचे मूल्य मिळू शकते. जर ग्राहकाला त्याच्या जुन्या फोनसाठी 12,000 रुपयेपर्यंत एक्स्चेंज व्हॅल्यू मिळाली तर तो Motorola Edge 50 फक्त 10,000 रुपये ते 11,000 रुपयेच्या दरम्यान खरेदी करू शकतो.

Flipkart Sale Motorola Edge 50 Discount Offer
Fact Check : देशभरातील ATM 2-3 दिवस बंद राहणार? काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य, जाणून घ्या

Motorola Edge 50 ची खास फीचर्स

  • डिझाईन व मजबुती: या स्मार्टफोनमध्ये इको-लेदर फिनिश आणि मजबूत अ‍ॅल्युमिनियम फ्रेम देण्यात आली आहे. याला IP68 रेटिंग असल्याने पाणी आणि धुळीपासून संरक्षण मिळते.

  • डिस्प्ले: 6.7-इंचाचा P-OLED डिस्प्ले असून 120Hz रिफ्रेश रेटमुळे स्क्रीनवर उत्कृष्ट व्हिज्युअल अनुभव मिळतो.

  • प्रोसेसर आणि OS: हा फोन Snapdragon 7 Gen 1 AE प्रोसेसरसह येतो आणि यात Android 14 आधीच इन्स्टॉल केलेले असते. भविष्यातील अपडेट्ससाठी देखील तयार आहे.

  • कॅमेरा : यामध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप (50MP + 10MP + 13MP) असून 32MP फ्रंट कॅमेरा सेल्फी आणि व्हिडिओ कॉलसाठी आदर्श आहे.

  • बॅटरी: 5000mAh क्षमतेची बॅटरी दिवसभर पुरेशी चालते, जी दीर्घकाळ वापरासाठी योग्य आहे.

Flipkart Sale Motorola Edge 50 Discount Offer
Government Schemes in War : युद्धकाळात लाडक्या बहिणीचे पैसे मिळणार का? सरकारी योजना बंद होणार? जाणून घ्या

स्मार्टफोन खरेदीसाठी उत्तम संधी

जर तुम्ही सध्या नवीन स्मार्टफोन घेण्याच्या विचारात असाल तर फ्लिपकार्टच्या या सेलमध्ये Motorola Edge 50 एक उत्तम पर्याय ठरू शकतो. उत्कृष्ट कॅमेरा, दमदार परफॉर्मन्स आणि प्रीमियम डिझाईनसह हा फोन आता अतिशय किफायतशीर दरात उपलब्ध आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com