
WhatsApp ग्रुप ॲडमिनची पावर वाढणार; येतंय नवीन फीचर, वाचा डिटेल्स
WhatsApp New Feature : व्हॉट्सॲप हे जगभरात सर्वाधिक वापरले जाणाऱ्या इन्स्टंट मेसेजिंग ॲप पैकी एक आहे, जे वापरण्यासही सोपे असल्याने व्हॉट्सॲप वापरणाऱ्यांची संख्या जगभरात सातत्याने वाढत आहे. आज जवळजवळ सर्व स्मार्टफोन वापरकर्ते व्हॉट्सॲप वापरतात. अशा परिस्थितीत व्हॉट्सॲप आपल्या यूजर्सचा अनुभव आणखी चांगला करण्यासाठी वेळोवेळी नवनवीन अपडेट्स घेऊन येत असते. याचाच भाग म्हणून व्हॉट्सॲपने आणखी एक नवीन फीचर आणले आहे. या नवीन फीचर अंतर्गत ग्रुप ॲडमिनची ताकद आणखी वाढणार आहे.
तुम्हीही व्हॉट्सॲप वापरत असाल आणि ग्रुपचे ॲडमिन असाल, तर हे फीचर तुमच्यासाठी खूपच फायदेशीर ठरणार आहे. वास्तविक, कंपनी अशा फीचरवर काम करत आहे, ज्याच्या अंतर्गत ग्रुप ॲडमिनला हवे असल्यास ग्रुपमधील कोणत्याही सदस्याचा मेसेज तो डिलीट करू शकतो. चला तर मग त्याबद्दल अधिक जाणून घेऊया.
नुकत्याच काही रिपोर्टमधून मिळालेल्या माहितीनुसार, मेटा (meta) च्या मालकीची ही कंपनी गेल्या काही दिवसांपासून या फीचरवर काम करत आहे. यावर अनेक चाचण्या जोरात सुरू आहेत. तो लवकरच लॉंच होण्याची अपेक्षा आहे. या फीचरला मॉडरेशन फीचर असे नाव दिले जाऊ शकते.
हेही वाचा: 30 दिवस वैधता असलेला एकतरी रिचार्ज प्लॅन हवा; TRAI चे निर्देश
दरम्यान, दुसरे इंस्टट मॅसेजिंग ॲप टेलीग्रामवर (Telegram) हे फीचर आधीपासूनच अस्तित्वात असलेल्या फीचरसारखेच असणार आहे. या अंतर्गत, ग्रुप ॲडमिनला त्याच्या ग्रुपमधील कोणत्याही सदस्याचा मेसेज त्याला आक्षेपार्ह वाटल्यास तो डिलीट करता येईल. वास्तविक, या फीचरची अनेक दिवसांपासून मागणी होत होती. अशा परिस्थितीत लोक आता त्याच्या रिलीजची वाट पाहत आहेत. या फीचरच्या मदतीने ग्रुप ॲडमिनचे अधिकार आणखी वाढणार आहेत. अलीकडेच व्हॉट्सॲपच्या व्हॉईस कॉल्सबाबत अनेक बदल करण्यात येत असल्याची चर्चा होती. अशा परिस्थितीत यूजर्स त्यांची आतुरतेने वाट पाहत आहेत.
हेही वाचा: रेल्वे स्टेशनची नावे पिवळ्या बोर्डवरच का लिहीतात? जाणून घ्या खास कारण
Web Title: Whatsapp New Feature Now Group Admin Will Able To Delete Any Member S Message From Group Chat
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..