esakal | आधी ऐका मग पाठवा व्हॉइस मेसेज; WhatsApp ने आणलंय नवं फिचर
sakal

बोलून बातमी शोधा

आधी ऐका मग पाठवा व्हॉइस मेसेज; WhatsApp ने आणलंय नवं फिचर

आधी ऐका मग पाठवा व्हॉइस मेसेज; WhatsApp ने आणलंय नवं फिचर

sakal_logo
By
शर्वरी जोशी

सध्याच्या काळात असा एकही व्यक्ती नसेल ज्या फोनमध्ये WhatsApp नाहीये. आज आपण प्रत्येक जण व्हॉट्सअ‍ॅपचा (WhatsApp) चा सर्रास वापर करतो. आपल्यापासून शेकडो दूर अंतरावर असलेल्या व्यक्तीशी या व्हॉट्सअ‍ॅपमुळे सहज संवाद साधता येतो. त्यामुळे व्हॉट्सअ‍ॅप हे लोकप्रिय इंस्टंट मेसेजिंग अ‍ॅप म्हणून ओळखलं जातं. विशेष म्हणजे व्हॉट्सअ‍ॅपची वाढती लोकप्रियता पाहता कंपनीदेखील युजर्ससाठी कायमच नवनवीन फिचर किंवा बदल आणत असते. यावेळीदेखील व्हॉट्सअ‍ॅपने व्हॉइस मेसेजमध्ये एक नवा बदल केला आहे. विशेष म्हणजे या नव्या बदलामुळे कोणताही व्हॉइस मेसेज पाठवण्यापूर्वी तुम्ही तो ऐकू शकता आणि त्यानंतरच तो पाठू शकता. (whatsapp-new-feature-will-allow-users-to-listen-voice-message-before-sending)

व्हॉट्सअ‍ॅपने आणलेल्या या नव्या फिचरमुळे आता युजर्स त्यांच्या व्हॉइस मेसेजचा प्लेबॅक स्पीड वाढवू शकतात. तसंच फास्ट प्लेबॅक फिचरमुळे आता कोणाच्याही आवाजाचा पिच न बदलता तो १ पेक्षा जास्त म्हणजे १.५,२ असा बदलता येणार आहे.

हेही वाचा: गाय-वासराला पाणीपुरीची भुरळ; पाहा भन्नाट व्हिडीओ

"हे नवीन फिचर वापरणं अगदी सोपं आहे. एखाद्याला व्हॉइस मेसेज पाठवण्यापूर्वी आपण व्हॉइस मेसेजचं बटण प्रेस करतो. त्याचवेळी प्लेबॅक स्पीडचा ऑप्शन उपलब्ध केला जाईल. जो डिफॉल्ट १ पेक्षा जास्त सेट केलेला असेल. त्यानंतर तुम्ही व्हॉइस मेसेजचं बटण दाबून तुम्हाला हव्या त्या स्पीडमध्ये मेसेज पाठवू शकता", असं कंपनीकडून सांगण्यात आलं आहे.

दरम्यान, कंपनी या नव्या फिचरला अॅड्रॉइडसाठी व्हॉट्सअ‍ॅप बीटा वर्जन 2.21.12.7 सह रोलआऊट करणार आहे. त्यामुळे हे व्हॉइस मेसेज सेंड करण्यापूर्वी तुम्ही ऐकू शकता. त्यानंतरच समोरच्या व्यक्तीला ते पाठवू शकता. तसंच ग्लोबल युजर्ससाठी या नव्या फिचरचं स्टेबल वर्जनदेखील लवकरच येणार असल्याचं म्हटलं जात आहे. या आठवड्याच्या सुरुवातीलाच कंपनीने फास्ट प्लेबॅक नावाचं एक नवं फिचर रोलआऊट केलं होतं. या नव्या फिचरमुळे युजर्सला आलेल्या व्हॉइस मेसेजचा स्पीड 1x,1.5x या 2x वर सेट करता येऊ शकतो.