व्हॉट्सऍपवर आता 'अलवेझ म्यूट', 'मीडिया गाईडलाईन्स' असे ऑप्शन; काय आहेत ते जाणून घ्या

सकाळ वृत्तसेवा
Friday, 2 October 2020

व्हॉट्सऍप सध्या आणखी नव्या फिचरवर काम करत आहे.

व्हॉट्सऍप नेहमीच आपल्या युझर्सना खुश ठेवण्यासाठी सातत्याने नवेनवे अपडेट आणत असते. युझर्सच्या गरजा आणि हवे असलेले फिचर्स याचा अंदाज घेऊन सातत्याने ऍपच्या अनेक फिचर्समध्ये बदल करत असते. युझर्सदेखील आपलं काम अधिक हलकं करणाऱ्या अशा अपडेटची वाटच पाहत असतात. 

बहुतेकदा युझर्सना नको असलेल्या ग्रुपमध्ये नाइलाजाने रहावं लागतं. त्या ग्रुप्समध्ये आलेले मॅसेज आणि त्याच्या नोटीफिकेशनने हैराण व्हायला होतं. अशावेळी नोटीफिकेशन म्यूट कराव्या  लागातात. मात्र, सध्या या नोटीफिकेशन जास्तीतजास्त एक वर्षासाठीच म्यूट करण्याचा पर्याय युझरसमोर आहे. या नोटीफिकेशनना कायमस्वरुपी बंद करण्याचा पर्याय असावा, असं अनेक युझर्सना सातत्याने वाटत असतं. म्हणूनच, आता व्हॉट्सऍपने 'अलवेझ म्यूट ऑप्शन' सारखे अनेक नवे फिचर्स आणले आहेत. हा अलवेझ म्यूट ऑप्शन वन इअर म्यूट ऑप्शनला रिप्लेस करणार आहे. या ऑप्शनमुळे युझर्सना आता नको असलेल्या ग्रुपमधून येणाऱ्या नको असलेल्या मॅसेजच्या नोटीफिकेशन आणि त्याच्या आवाजापासून कायमची सुटका मिळणार आहे. 

व्हॉट्सऍप सध्या आणखी एका फिचरवर काम करत आहे. या फिचरचे नाव आहे 'मीडिया गाईडलाइन्स' असे आहे. या फिचरनुसार युझर्सना अगदी सहजरित्या इमेज, व्हिडीओ आणि गिफ्स एडीट करता येणार आहेत. 

व्हेरीफाईड बिजनेस व्हॉट्सऍप  हे सध्या व्हॉईस आणि व्हिडीओ कॉलचे बटन हलवण्याच्या विचारात आहे. ही दोन्ही बटने सध्या प्रोफाईल आयकॉनच्या आत चॅट आणि कॉन्टॅक्ट लिस्टमध्ये आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: WhatsApp new features updates always mute & media guidelines