
WhatsApp New Features : व्हॉट्सअॅपवरुन फोटो शेअर करताना त्यांची क्वालिटी कमी होते, हे सगळ्यांनाच माहिती आहे. यामुळेच कित्येक वेळा लोक दुसऱ्यांना फोटो मागताना ते 'डॉक्युमेंट' फॉर्ममध्ये मागतात. अशा प्रकारे फोटो पाठवणं हे अगदी किचकट असतं. मात्र आता व्हॉट्सअॅपवरुन HD फोटो पाठवता येणार आहेत.
जगातील सर्वात लोकप्रिय मेसेजिंग अॅप असणाऱ्या व्हॉट्सअॅपने एक नवीन फीचर लाँच केलं आहे. यामुळे आता यूजर्स एकमेकांना उत्तम क्वालिटीचे फोटो पाठवू शकणार आहेत. कंपनीने हे फीचर नुकतंच जारी केलं असून, ते टप्प्या-टप्प्याने सर्व यूजर्ससाठी उपलब्ध होईल. यासोबतच कंपनी HD व्हिडिओ फीचरवरही काम करत असल्याची माहिती समोर आली आहे.
एचडी फोटो पाठवण्यासाठी सर्वात आधी तुम्हाला व्हॉट्सअॅप चॅट उघडावं लागेल. यानंतर फोटो पाठवण्याच्या पर्यायावर टॅप करा. त्यानंतर तो फोटो निवडा, जो तुम्हाला पुढील व्यक्तीला पाठवायचा आहे. या फोटोवर टॅप केल्यावर तुम्हाला स्क्रीनवर HD हा पर्याय दिसेल. यावर क्लिक करुन फोटो सेंड करा.
यानंतर हा फोटो HD फॉर्ममध्ये सेंड होईल. जर तुम्ही हा पर्याय निवडला नाही, तर फोटो नेहमीप्रमाणे कॉम्प्रेस्ड फॉर्ममध्ये पाठवला जाईल. HD फोटो शेअर केल्यानंतर समोरच्या व्यक्तीलाही फोटोच्या खाली एक HD लोगो दिसेल.
एचडी फोटो पाठवताना फोटोची साईज वाढणार आहे, त्यामुळे नेहमीपेक्षा जास्त इंटरनेट खर्च होईल. हे टाळायचं असेल तर एचडी पर्याय सिलेक्ट न करता नेहमीप्रमाणे फोटो पाठवण्याचा पर्याय यूजर्स अवलंबू शकतात.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.