व्हॉट्सअॅपवर 'Forwarded message' ओळखता येणार

Friday, 8 June 2018

व्हॉट्सअॅपवर आलेला मेसेज फॉरवर्ड करणारे बरेच लोक आहेत. या फॉरवर्ड मेसेजमुळे अनेकदा खोट्या बातम्या किंवा अफवा पसरवणाऱ्यांचे फावते. व्हॉट्सअॅपच्या या अपडेटमुळे मात्र आता एखाद्याने पाठवलेला मेसेज फॉरवर्ड केलेला असेल तर ते ओळखणे शक्य आहे. अशा मेसेजवर ‘Forwarded’ असे लेबल दिसेल. हे लेबल हटवता येणे शक्य नसल्याने आपल्याला आलेला मेसेज पाठवणाऱ्याने स्वतः टाईप केला आहे की‘Forwarded’ आहे हे ओळखता येईल. 

व्हॉट्सअॅपवर दिवसभरातून कितीतरी मेसेज येत असतात. परंतू एखादा मेसेज पाठवणाऱ्याने स्वतः टाईप केला आहे की तो 'Forwarded message' आहे, हे ओळखता येत नसे. पण यापुढे व्हॉट्सअॅपवर येणारा मेसेज 'Forwarded' असल्यास तशी माहिती देणारे अपडेट व्हॉट्सअॅपने आणले आहे. 

व्हॉट्सअॅपवर आलेला मेसेज फॉरवर्ड करणारे बरेच लोक आहेत. या फॉरवर्ड मेसेजमुळे अनेकदा खोट्या बातम्या किंवा अफवा पसरवणाऱ्यांचे फावते. व्हॉट्सअॅपच्या या अपडेटमुळे मात्र आता एखाद्याने पाठवलेला मेसेज फॉरवर्ड केलेला असेल तर ते ओळखणे शक्य आहे. अशा मेसेजवर ‘Forwarded’ असे लेबल दिसेल. हे लेबल हटवता येणे शक्य नसल्याने आपल्याला आलेला मेसेज पाठवणाऱ्याने स्वतः टाईप केला आहे की‘Forwarded’ आहे हे ओळखता येईल. 

सध्या अँड्राईड बीटा व्हर्जनवर (2.18.179) हे अपडेट उपलब्ध असून लवकरच सर्व व्हॉट्सअॅप युजर्ससाठी हे फिचर उपलब्ध होईल.
 
स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: WhatsApp now tells you if a message you've received is forwarded