esakal | गुगलवर बॅकअप स्टोअर करत असाल, तर हे जाणून घ्या!
sakal

बोलून बातमी शोधा

google photos

गुगलवर बॅकअप स्टोअर करत असाल, तर हे जाणून घ्या!

sakal_logo
By
भक्ती सोमण-गोखले

जेव्हा तुम्ही व्हॉट्सअॅपवरचा बॅकअप गुगल ड्राईव्हवर घेत होतात तेव्हा तुम्हाला msgसह व्हॉईस मेसेजेस, फोटो, व्हिडिओ असे सगळे आपोआप सेव्ह करता यायचे. पण आता व्हॉट्सअॅपवरून  तुम्हाला नेमका कशाचा बॅकअप घ्यायचा आहे, हे ठरवू देण्याची मुभा गुगल ड्राईव्ह युजर्सना देणार आहे. सध्या अॅन्ड्राईड धारकांसाठी गुगलने ड्राईव्हवर  व्हॉट्सअॅप बॅकअप घेण्याची सुविधा दिली आहे. हा मोठा बदल होण्यासाठी गुगलची भूमिका मोठी आणि महत्वाची आहे. 

WABetaInfo च्या अहवालावर विश्वास ठेवल्यास व्हॉट्सअॅपकर्त्यांसाठी अमर्यादित बॅकअप सेवा लवकरच संपू शकते असे दिसते. तर बॅकअपच्या आकारावर अधिक नियंत्रण देण्याची सुविधा वापरकर्त्यांना नवीन रूपरेषेनुसार मिळेल. अर्थात याच्याशी गुगलचा संबंध असेल. तर, गुगलने या वर्षाच्या सुरवातीलाच फोटो सेव्ह करण्यासाठी आवश्यक असलेली अमर्यादित बॅकअपची सोय बंद केली. त्यामुळे युजर्सचा हिरमोड झाला होता. गुगल वापरकर्त्यांना ही सोय गेली सहा वर्षे विनामूल्य देत होते. मात्र गुगलने आता थांबण्याची वेळ आली आहे, असा निर्णय घेतला. व्हाट्सअप बाबतीत असेच घडणार असून गुगलकडून लवकरच बॅकअपची मर्यादा जाहीर करण्यात येणार आहे.

WhatsApp

WhatsApp

अशी असतील नवी वैशिष्ट्ये

WABetaInfo च्या अहवालानुसार, "बॅकअप आकार व्यवस्थापित करा" असा पर्याय वापरकर्त्यांना दिला जाईल. यामध्ये त्यांच्या स्मार्टफोनमधून नेमके काय बॅकअप करायचे आहे हे ठरविण्याची परवानगी देईल. निवडलेल्या फायलींचा बॅकअप घेण्यासाठी वापरकर्त्यांना त्यांच्या गरजेनुसार स्टोरेज उपलब्ध होईल.

व्हॉट्सअॅप चॅट, अँड्रॉइडवर फोटो, व्हिडिओ, ऑडिओ फायली, डॉक्युमेंट्स आणि इतर माध्यमांसह त्यांचे बॅकअप साईज व्यवस्थापित करताना युजर्सना पर्याय दिले जातील. युजर सेटिंग्ज आणि चॅट डेटाबेसचा ऑटोमॅटिक बॅकअप घेतला जाईल. तो बंद करण्याचा पर्याय वापरकर्त्यांना नसेल.

मात्र, अँड्रॉइड फोनवर बॅकअप कसे साठवले जातात या बदलांविषयी व्हॉट्सअॅप किंवा गुगलकडून अद्याप कोणताही अधिकृत माहिती आलेली नाही. तरीही Google आपल्या वापरकर्त्यांना यापुढे मोफत स्टोरेज देऊ इच्छित नाही, ही गोष्ट स्पष्ट दिसते आहे

loading image
go to top