चिंता नको, Whatsappचा डेटा सर्वरमधून डिलिट करता येतो; जाणून घ्या प्रोसेस

whatsapp
whatsapp

नवी दिल्ली - सर्वाधिक लोकप्रिय सोशल मीडिया मेसेजिंग अ‍ॅप व्हॉटसअ‍ॅपच्या प्रायव्हसी पॉलिसीची चर्चा सध्या सर्वत्र होत आहे. नव्या प्रायव्हसी पॉलिसीमुळे युजर्स नाराज आहेत. त्यामुळे अनेक युजर्स व्हॉटसअ‍ॅपला पर्यायी अ‍ॅप शोधत आहेत. व्हॉटसअ‍ॅपने नव्या पॉलिसीमध्ये डेटा फेसबुकसह त्यांच्या कंपनीसोबत शेअर केला जाईल असं नोटिफिकेशन युजर्सना पाठवलं आहे. हे स्वीकारण्यासाठी 8 फेब्रुवारीपर्यंतचा वेळ देण्यात आला असून नोटिफिकेशन स्वीकारलं नाही तर व्हॉटसअ‍ॅपचा वापर करता येणार नाही. 

व्हॉटसअ‍ॅप युजरचा जो डेटा शेअर करतो त्यामध्ये लोकेशनची माहिती, आयपी अ‍ॅड्रेस, टाइम झोन, फोनचं मॉडेल, ऑपरेटिंग सिस्टिम, बॅटरी लेव्हल, सिग्नल स्ट्रेन्थ, ब्राउझर, मोबाइल नेटवर्क, आय़एसपी, भाषा, आयएमईआय नंबर इत्यादींचा समावेश आहे. तसंच युजर किती कॉल आणि मेसेज करतो. त्याचे प्रोफाइल पिक्चर, लास्ट सीन, स्टेटस, ग्रुप काउंट याचाही समावेश आहे. 

व्हॉटसअ‍ॅप पॉलिसीवर नाराज असलेले युजर्स आता अ‍ॅप अनइन्स्टॉल करत आहेत. मात्र अशावेळी संपूर्ण डेटा कसा डिलिट करायचा याची माहिती असणं गरजेचं आहे. फक्त व्हॉटसअ‍ॅप अनइन्स्टॉल करून डेटा डिलिट होत नाही. तुम्ही पुन्हा जेव्हा अ‍ॅप इन्स्टॉल कराल तेव्हा सगळा डेटा रिस्टोअर होतो. त्यासाठी काही सेटिंग कऱणं आणि डेटा डिलिट करण्याची गरज आहे. 

चॅट बॅकअप करा डिलिट

व्हॉटसअ‍ॅप चॅटचा संपूर्ण बॅकअप मोबाइल मेसेजमध्ये सेव्ह असतो. तो डिलिट करण्यासाठी तुमच्या मोबाइलमधील फाइल मॅनेजरमध्ये जावं लागेल. /sdcard/WhatsApp/Databases/ नावाच्या फोल्ड़रमध्ये चॅट बॅकअपची एक फाइल असते. यात एक आठवड्याचा बॅकअप असतो. गॅलरीमधून किंवा इतर कुठूनही ही फाइल ओपन होत नाही. त्यासाठी तुम्हाला फोल्डरमध्ये जाऊनच डिलिट करावी लागते. 

फाइल मॅनेजर ओपन केल्यानंतर त्या व्हॉटसअ‍ॅप फोल्डर असतो. त्यामध्ये अनेक फोल्डर असतात त्यापैकी डेटाबेस फोल्डर डिलिट केल्यास चॅट बॅकअप पूर्णपणे डिलिट होईल. जर तुम्ही चॅट बॅकअप ऑप्शनमध्ये गुगल ड्राइव्ह पर्याय निवडला असेल तर तो ऑफ केल्यास तिथेही चॅट बॅकअप सेव्ह होणार नाही. 

व्हॉटसअ‍ॅप अकाउंट डिलिट कसे करायचे
 अ‍ॅप अनइन्स्टॉल करण्याआधी तुम्ही अकाउंट डिलिट करणं महत्त्वाचं आहे. त्यासाठी More options > Settings > Account > Delete my account अशा पद्धतीने प्रोसेस करावी लागेल. 

Delete my account करण्याआधी तुमचा व्हॉटसअ‍ॅप नंबर द्यावा लागतो. त्यावेळी तुम्ही अकाउंट का डिलिट करताय तेसुद्धा सांगावं लागेल.  अकाउंट डिलिट केल्यानंतर तुमचे मेसेज हिस्ट्रीसुद्धा डिलिट होईल. यासोबत सर्व ग्रुपमधून तुम्ही लेफ्ट व्हाल. याशिवाय गुगल ड्राइव्हला असलेला बॅकअपसुद्धा डिलिट होईल. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com