नव्या अपडेटप्रकरणी WhatsApp म्हणतं घाबरण्याचं कारण नाही!

सकाळ न्यूज नेटवर्क
Sunday, 10 January 2021

फेसबुकच्या मालकीच्या व्हॉट्सअॅपने नव्या अपडेटमुळे जगभरातून होणाऱ्या टीकेनंतर हे स्पष्टीकरण दिलं आहे. 

नवी दिल्ली- इन्स्टंट मेसेजिंग ऍप व्हॉट्सअॅपने (WhatsApp) शनिवारी स्पष्ट केलंय की नव्या अपडेटमुळे फेसबुकसोबत (Facebook) डाटा शेअर करण्याच्या नितीमध्ये कोणताही बदल होणार आहे. फेसबुकच्या मालकीच्या व्हॉट्सअॅपने नव्या अपडेटमुळे जगभरातून होणाऱ्या टीकेनंतर हे स्पष्टीकरण दिलं आहे. 

काय आहे WhatsApp ची नवी पॉलिसी

व्हॉट्सअॅपने या आठवड्याच्या सुरुवातीला आपली प्रायवेसी पॉलिसी अपडेट केली. ही पॉलिसी 8 फेब्रुवारीपासून लागू केली जाईल. व्हॉट्सअपने सांगितलं की यूझर्सचा डाटा प्रोसेस केला जाऊ शकेल आणि डाटा फेसबुकसोबत शेअर केला जाऊ शकतो. अपडेटमध्ये असाही इशारा देण्यात आलाय की, व्हॉट्सअॅपची सेवा सुरु ठेवण्यासाठी य़ूझर्सला 8 फेब्रुवारी 2021 पर्यंत नवीन अटी आणि नियम (New Terms and Policy) स्वीकाराव्या लागतील. 

लॉकडाऊनमुळे कोरोनाचा उद्रेक 3 महिने पुढे ढकलला; तज्ज्ञ समितीचा दावा

व्हॉट्सअॅप फेसबुकसोबत डाटा शेअर करण्याच्या बातमीने सोशल मीडियावर वाद सुरु झाला. त्यानंतर सिग्नल आणि टेलीग्रामसारख्या प्रतिस्पर्धी ऍप्सच्या डाऊनलोडमध्ये वाढ झाल्याचे पाहायला मिळाले. 

व्हॉट्सअॅपचे प्रमुख विल कॅथार्ट यांची प्रतिक्रिया

व्हॉट्सअॅपचे प्रमुख विल कॅथार्ट (Will Cathcart) यांनी ट्विट करुन याप्रकरणी भाष्य केलं आहे. ते म्हणालेत की, कंपनीने आपल्या निती पारदर्शी आणि पीपल्स-टू-बिझनेस पर्यायी फिचरची माहिती देण्यासाठी अपडेट केलं आहे. त्यामुळे आमच्या फेसबुकसोबत डाटा शेअर करण्याच्या पॉलिसीवर कोणताही परिणाम पडणार नाही. 

दरम्यान, व्हॉटसअ‍ॅपने त्याच्या अपडेट पॉलिसीमध्ये कंपनीला तुम्ही जी परवानगी देता त्याबाबत सांगितलं आहे. यात म्हटलं आहे की, आमची सर्विस वापरण्यासाठी व्हॉटसअ‍ॅपला जो कंटेंट तुम्ही अपलोड करता, सबमिट, स्टोअर किंवा सेंड, रिसिव्ह करता त्याला पुन्हा वापरण्यास, डिस्ट्रिब्यूट आणि डिस्प्ले करण्यासाठी जगभरातील नॉन एक्स्लूझिव्ह, रॉयल्टी फ्री तसंच हस्तांतरणासाठी परवानगी देते. दरम्यान, चॅटिंग आणि त्यात पाठवण्यात आलेला डेटा एंड टू एंड इन्क्रिप्टेड असणार आहे. तो फक्त संबंधित युजर्सनाच दिसेल आणि सेव्ह केला जाणार नाही. 

कंपनी तुमची कोणती माहिती गोळा करते याबद्दलही पॉलिसीमध्ये सांगण्यात आलं आहे. व्हॉटसअ‍ॅपवर तुमच्या सर्व अ‍ॅक्टिव्हीटींची माहिती सेव्ह केली जाते. यामध्ये सर्विस रिलेटेड आणि परफॉर्मन्सची माहिती असते. तसंच तुम्ही केलेलं प्रायव्हसी सेटिंग, तुम्ही इतरांशी कसे संवाद साधता. यामध्ये बिझनेसशी संबंधित माहितीचाही समावेश असतो. तसंच किती वेळा, किती काळ वापर करता हेसुद्धा पाहिलं जातं. याशिवाय व्हॉटसअ‍ॅपची चॅटिंग, कॉल, स्टेटस, ग्रुप अ‍ॅक्टिव्हीटीही सेव्ह केली जाते. ग्रुपची नावे, प्रोफाइल फोटो, ग्रुप डिस्क्रिप्शन इत्यादी माहिती सेव्ह होते. 

कंपनीने म्हटलं आहे की, युजर्सने अ‍ॅपचा वापरा कधीपासून सुरू केला. त्याच्या मोबाइल डिव्हाइसचे डिटेल्स, आयपी अ‍ॅड्रेस तसंच युजरने जी माहिती वापरण्यासाठी परवानगी दिली आहे ती माहिती फेसबुक आणि कंपनीसोबत शेअर केली जाते.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: WhatsApp Will Cathcart explanation on New Terms and Policy