WhatsApp New Feature : आता तुमचे चॅट्स करा 'लॉक', प्रायव्हसीसाठी आलं व्हॉट्सअ‍ॅपचं नवीन फीचर; अशी करा सेटिंग

हे फीचर ग्रुप आणि पर्सनल अशा दोन्ही प्रकारच्या चॅट्सना लागू होणार आहे.
WhatsApp Chat Lock
WhatsApp Chat LockEsakaal

बऱ्याच वेळा आपला फोन दुसऱ्याच्या हातात देण्यास, किंवा एखाद्या ठिकाणी सोडून जाण्यास आपण तयार नसतो. त्याला कारण म्हणजे इतरांनी आपले व्हॉट्सअ‍ॅप चॅट्स वाचू नयेत. व्हॉट्सअ‍ॅप हे एंड-टू-एंड इनस्क्रिप्टेड असलं, तरी एखाद्या व्यक्तीला आपल्या फोनचा पासवर्ड मिळाला की त्याला आपले चॅट्स वाचता येत होते. मात्र, आता व्हॉट्सअ‍ॅपने आपले चॅट्स लॉक करण्याचं फीचर (WhatsApp new Feature) लाँच केलं आहे.

व्हॉट्सअ‍ॅपची पॅरेंट कंपनी असलेल्या मेटाने या फीचरची घोषणा केली आहे. यामुळे आपल्याला व्हॉट्सअ‍ॅपमधील ठराविक चॅट्स लॉक करता येणार आहेत. त्यामुळे तुमचा फोन अनलॉक केला असला, तरीही तुम्ही लॉक केलेले चॅट्स इतर कोणीही वाचू शकणार नाही. विशेष म्हणजे हे फीचर (WhatsApp Chat Lock) ग्रुप आणि पर्सनल अशा दोन्ही प्रकारच्या चॅट्सना लागू होणार आहे.

अशी करा सेटिंग

व्हॉट्सअ‍ॅपचे हे फीचर वापरण्यासाठी तुम्हाला काही सेटिंग्स कराव्या लागतील. सर्वात आधी व्हॉट्सअ‍ॅप उघडा. त्यानंतर एखादे ग्रुप किंवा पर्सनल चॅट ओपन करा. यात सगळ्यात खाली स्क्रोल करत गेल्यानंतर तुम्हाला 'लॉक चॅट' (WhatsApp Chat Lock Feature) हा पर्याय दिसेल. यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचा पासवर्ड किंवा बायोमेट्रिक व्हेरिफाय करावे लागेल. यानंतर तुम्ही निवडलेले चॅट लॉक होईल.

WhatsApp Chat Lock
WhatsApp Chat Restore: व्हॉट्सअॅप मेसेजला करा झटक्यात रिस्टोअर; या आहेत सोप्या टिप्स

यानंतर लॉक केलेले चॅट उघडण्यासाठी तुम्ही डिव्हाईस पिन किंवा बायोमॅट्रिक लॉक, म्हणजेच फिंगरप्रिंट लॉक किंवा फेस लॉकचा वापर करू शकता. यामुळे तुमचा फोन दुसऱ्या व्यक्तीकडे असला, तरीही तुमच्या परवानगीशिवाय ती व्यक्ती तुमचे लॉक चॅट्स वाचू शकणार नाही. याशिवाय, लॉक असलेल्या चॅटमधील कंटेंट नोटिफिकेशन मध्येही दिसून येणार नाही.

WhatsApp Chat Lock
Twitter New Feature : आता Twitter आणणार ऑडिओ आणि व्हिडिओ कॉलचं फीचर, WhatsApp चं वाढलं टेन्शन

अपडेट करावे लागेल अ‍ॅप

व्हॉट्सअ‍ॅपने हे फीचर आपल्या सर्व यूझर्ससाठी रोलआऊट केले आहे. येत्या काही दिवसांमध्ये ते सर्वांसाठी उपलब्ध होईल. तुमच्या स्मार्टफोनवर जर हे फीचर दिसत नसेल, तर तुम्हाला अ‍ॅप अपडेट करावे लागेल.

WhatsApp Chat Lock
Whatsapp : केंद्र सरकारच्या इशाऱ्यानंतर 'व्हॉट्सअप'चं आश्वासन; आंतरराष्ट्रीय स्पॅम कॉल्स 50 टक्के कमी करणार

व्हॉट्सअ‍ॅपच्या कोट्यवधी यूझर्सना या फीचरचा फायदा होणार आहे. यामुळे आपल्याला कंपनीचे महत्त्वाचे ग्रुप, किंवा महत्त्वाचे खासगी चॅट्स लॉक करून ठेवता येणार आहेत. आपल्या प्रायव्हसीसाठी व्हॉट्सअ‍ॅपचे हे फीचर नक्कीच फायद्याचे ठरणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com