WhatsAppवर असं करा 'Secret Chat', मेसेज होतील ऑटोमेटिक डिलीट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

WhatsApp

WhatsAppवर असं करा 'Secret Chat', मेसेज होतील ऑटोमेटिक डिलीट

आजकाल आपण सगळेच जण व्हॉट्सअ‍ॅपचा वापर करतो. एखाद्याशी गप्पा मारण्यासाठी किंवा फोटो आणि व्हिडिओ शेयर करण्यासाठी व्हॉट्सअ‍ॅप वापरले जाते. इतकेच नाही तर व्हॉईस कॉलपासून व्हिडिओ कॉलिंगपर्यंत, व्हॉट्सअ‍ॅपने सगळं काही सोपं केले आहे. व्हॉट्सअ‍ॅप देखील आपल्या वापरकर्त्यांच्या गरजेनुसार अनेक फीचर्स अपडेट करत राहते. नुकतेच असेच व्हॅट्सअॅपनं भन्नट फीचर्स आणलं आहे. या फीचर्समुळे आपण चॅटिंग सिक्रेट आणि सिक्योरपणे करु शकतो. या फीचरला अॅक्टिव्हेट केल्यनंतर सर्व मेसेज निर्धारित वेळेवर ऑटेमेटिक डडिलीट होतात, जे प्रायव्हेसीसाठी सर्वात महत्वाचं आहे. जर तुम्हाला हे फीचर्स सुरु करायचं असेल तर काही सोप्या टेप्स फॉलो कराव्या लागतील. असे बरेच लोक आहेत ज्यांना व्हॉट्सअ‍ॅपच्या मूलभूत बेसीक फीचर्स सोडून इतर सिक्रेट फीचर्स माहितच नाहीत. आज आज आपण व्हॉट्सअॅपचे सीक्रेट फीचर्स जाणून घेणार आहोत.

तुमच्याशिवाय कोणीही पाहू शकणार नाही मेसेज -

व्हॉट्सअॅपच्या या नव्या फीचरमुळे पर्सनल चॅटिंगला सिक्रेट ठेवू शकता. म्हणजेच, तुमच्या परवानगीशिवाय कोणीही मेसेज वाचू शकणार नाहीत. तुमचं चॅटिंग पुर्णपणे सुरक्षित राहिल.

'डिसअपीअरिंग मेसेज' फीचरचा करा वापर -

आतापर्यंत कोट्यवधी व्हॅट्सअॅप यूजर्स मेसेज सीक्रेट ठेवण्यासाठी अर्काइव्ह चॅटचा वापर करत होतो. किंवा सर्व मेसेज मॅन्युअली डिलीट करत होते. हे टेन्शन व्हॅट्सअॅपनं संपवलं आहे. नुकतेच व्हॅट्सअॅपनं डिसअपीअरिंग मेसेज (Disappearing Message) फीचर लॉन्च केलं होतं. या फीचरबद्दल अनेकांना माहितीही नाही.

आपोआप डिलीट होतील मेसेज -

व्हॅट्सअॅप कंपनीनं दिलेल्या माहितीनुसार, डिसअपीरिंग फीचरला सेटिंग्समध्ये जाऊन ऑन करावं लागेल. त्यानंतर सात दिवसानंतर तुमचे मेसेज आपोआप डिलीट होतील. त्याशिवाय युजर्स मेसेज डिलीट करण्याची वेळ ठरवू शकतो, जेणेकरुन त्या निर्धारित वेळेनंतर मेसेज आपोआप डिलीट होतील.

असं करा अॅक्टिव

'डिसअपीयरिंग मेसेज' फीचरला अॅक्टिव करणं सोपं आहे. सर्वात आधी त्या चॅटला ओपन करा, ज्याचे मेसेज आरोपाठ डिलिट करायचे आहेत. त्यानंतर त्या युजर्सची प्रोफाइल दिसेल. त्या नावावर क्लीक केल्यानंतर डिसअपीयरिंग मेसेज हा पर्याय दिसेल. तो ऑन करा.

पिन लॉक वापरा -

याशिवाय व्हॅट्सअॅपनं फिंगरप्रिंट लॉकचाही पर्याय दिला आहे. ज्यामुळे तुमचे मेसेज कोणीही वाचू शकणार नाहीत. जर कोणाला मेसेज वाचायचे असतील तर तुमची परवानगी लागेल. सेटिंगमधून प्रायव्हेसी ऑप्शनमधून या पर्यायाला सुरु करु शकता.

टॅग्स :whatsapp