WhatsApp होणार बंद?

वृत्तसंस्था
शुक्रवार, 16 ऑगस्ट 2019

- सध्या लाखो युजर्स WhatsApp चा करत आहेत वापर.

- युजर्सचे अकाऊंट बंद करण्याचा निर्णय घेतला आहे कंपनीने.

- त्यासाठी WhatsApp करणार फिचर लाँच.

नवी दिल्ली : सध्या लाखो युजर्स WhatsApp चा वापर करत आहेत. मात्र, यातील अल्पवयीन युजर्सचे अकाऊंट बंद करण्याचा निर्णय कंपनीने घेतला आहे. त्यासाठी WhatsApp असे फिचर लाँच करणार आहे. या नव्या फिचरच्या माध्यमातून वयाची अट पूर्ण न केलेल्या युजर्सचे खाते बंद करणे शक्य होईल. 

कंपनीच्या नियमाप्रमाणे युरोपीय देशांतील युजर्ससाठी किमान वयोमर्यादा ही 16 वर्षे होती. तर युरोप वगळता इतर देशांतील युजर्ससाठी किमान वयोमर्यादा ही 13 वर्षे  आहे. तसेच 13 वर्षांखालील युजर्संना त्यांच्या पालकांची सहमती असणे आवश्यक मानले जाते. मात्र, हे अ‍ॅप आता 13 वर्षांहून लहान मुलं वापरत असल्याचे कंपनीच्या निदर्शनास आले आहे. त्यामुळे वयाची अट पूर्ण न करणाऱ्या युजर्सचे खाते बंद होणार असल्याची माहिती मिळत आहे. 

दरम्यान, अल्पवयीन युजर्स अकाऊंटची चाचणी कशी करण्यात येईल. याबाबत WhatsApp ने अद्यापही स्पष्ट केलेले नाही. मात्र, वयाची अट पूर्ण न युजर्सचे अकाऊंट बंद करण्याचा कंपनीचा विचार आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: WhatsApp Services may be Stopped for Minors