व्हॉट्सअॅपने आणलंय नवीन फिचर; आता तुमच्या डोळ्यांना होणार नाही त्रास!

वृत्तसंस्था
बुधवार, 4 मार्च 2020

व्हॉट्सअॅपमध्ये पांढरी बॅकग्राऊंड आणि काळ्या रंगातील अक्षरांमुळे डोळ्यांना त्रास होतो, असे संशोधनात निष्पन्न झाले होते. मात्र, आता यावर उपाय काढत व्हॅट्सअॅपने डारेक मोडची संकल्पना आणली आहे. डा

व्हॉट्सअॅप नेहमीच आपल्या युजरच्या सोयीसीठी अॅपमध्ये नवनवीन बदल करत असतात. अशाच प्रकारे व्हॉट्सअॅपने आणखी एक महत्त्वाचे फिचर सुरू केले आहे. व्हॉट्सअॅपमध्ये तुम्हाला आता 'डार्क मोड' फिचर वापरता येईल. मागील अनेक दिवसांपासून या फिचरची प्रतिक्षा होती. आता हे फिचर व्हॉट्सअॅप अपडेट केल्यानंतर युजर्सना वापरता येईल.  या फिचरमुळे मोबाईल लाईटचा वापर कमी होऊन बॅटरी वाचण्यास मदत होईल.  

बापरे ! कोरोना पोचला बंगळुरात....

काय आहे 'डार्क मोड'?
व्हॉट्सअॅपमध्ये पांढरी बॅकग्राऊंड आणि काळ्या रंगातील अक्षरांमुळे डोळ्यांना त्रास होतो, असे संशोधनात निष्पन्न झाले होते. मात्र, आता यावर उपाय काढत व्हॅट्सअॅपने डारेक मोडची संकल्पना आणली आहे. डार्क मोड या फिचरमुळे व्हॉट्सअॅपची बॅकग्राऊंड ग्रे होणार असून त्यावरील अक्षरे ऑफव्हाईट रंगात दिसणार आहेत. त्यामुळे डोळ्यांवर ताण न येता व्यवस्थित चॅटिंग करता येईल असे कंपनीने सांगितले. स्क्रिन ब्राईटनेस व कॉन्ट्रास्ट रंग डोळ्यांना उपयुक्त असल्याने व्हॉट्सअॅप वापरताना चांगला अनुभव येईल. विशेष म्हणजे पाहिजे तेव्हा या अॅपमध्ये डार्क मोड सुरू बंद करता येईल.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

अँड्रॉइड 10 आणि IOS 13 युजर्स डार्क मोड फीचर डायरेक्ट सिस्टिम सेटिंग्समध्ये जाऊन सुरू किंवा बंद करु शकतात. तर, अँड्रॉइड 9 आणि त्यापेक्षा जुन्या ओएस युजर्सना WhatsApp Settings - Chats - Theme - select 'Dark' या पद्धतीने डार्क मोड फीचर वापरता येईल. डार्क मोडसाठी सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे तुमच्याकडील WhatsApp लेटेस्ट व्हर्जनचे असावे, जर नसेल तर तुम्ही प्ले स्टोअरमध्ये जाऊन WhatsApp अपडेट करु शकतात.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: whatsapp starts new feature of Dark Mode