लवकरच 'या' आयफोन्समध्ये बंद होणार WhatsApp; जाणून घ्या डिटेल्स

whatsapp to end support for these ios users includes ios 10 ios 11 iphone 5 and iphone
whatsapp to end support for these ios users includes ios 10 ios 11 iphone 5 and iphone sakal

येत्या काही महिन्यांत आयफोनच्या काही मॉडेल्सवर व्हॉट्सअॅप वापरता येणार नाहीये तुम्हीही आयफोन यूजर असाल तर ही बातमी तुमच्या उपयोगाची आहे. काही आयफोन्समध्ये WhatsApp सपोर्ट बंद होणार आहे त्यामुळे तुमच्याकडे हे आयफोन मॉडेल असेल तर तुम्हाला अडचणीचा सामना करावा लागू शकतो.

WhatsApp येत्या काही महिन्यांत iOS 10, iOS 11, iPhone 5 आणि iPhone 5C साठी सपोर्ट बंद करण्याचा विचार करत आहे. बदलते जग आणि त्याच्या धोक्यांसह, वापरकर्त्यांच्या गोपनीयतेची सुरक्षा आणि सुरक्षितता वाढविण्यासाठी कंपन्या नवीन बदल लागू करत स्वतःला अपडेट करत राहतात. त्याचप्रमाणे, इन्स्टंट मेसेजिंग अॅपने जुन्या iPhones मध्ये चालणाऱ्या iOS च्या जुन्या आवृत्त्यांसाठी सपोर्ट बंद करण्याची घोषणा केली आहे.

अनेक फीचर्स बंद होतील

जे वापरकर्ते अजूनही जुने iOS व्हर्जन वापरत आहेत त्यांना या अपडेटनंतर व्हॉट्सअॅपचे अनेक इन-अॅप फीचर्स वापरता येणार नाहीत. या फीचर्समध्ये रिअॅक्शन आणि पेमेंट यांचा समावेश असू शकतो परंतु या बदलामुळे कोणत्या फीचर्सवर परिणाम होईल हे अद्याप समोर आलेलं नाही. Android इकोसिस्टम सोबत अपडेट ठेवण्यासाठी WhatsApp हा निर्णय घेत आहे.

whatsapp to end support for these ios users includes ios 10 ios 11 iphone 5 and iphone
"लाथ मारा अशा खासदारकीला"; निलेश राणेंचं संभाजीराजेंंना आवाहन

वापरकर्त्यांकडे पाच महिने आहेत

WhatsApp ट्रॅकर, WABetaInfo नुसार, WhatsApp 24 ऑक्टोबर 2022 पासून वर नमूद केलेल्या iPhones ला सपोर्ट करणे बंद करेल, म्हणजेच या iPhone वापरकर्त्यांकडे सुमारे पाच महिने आहेत. 24 ऑक्टोबर 2022 नंतर, WhatsApp ची सर्व फीचर्स iOS 10 आणि iOS 11 वर चालणार्‍या डिव्हाइसवर काम करणार नाहीत. WhatsApp फीचर्सचा पूर्णपणे आनंद घेण्यासाठी सगळ्यात कमी सपोर्ट बेस iOS 12 आणि त्यावरील असेल.

Apple iPhone 5 आणि iPhone 5C हे iOS 12 शी कंम्पॅटिबल नाहीत आणि म्हणून हे वापरकर्ते WhatsApp वापरू शकणार नाहीत. व्हॉट्सअॅप चॅट्सची सुरक्षा आणि अॅपमधील इतर फीचर्स अपग्रेड करत आहे त्याचा हा परिणाम आहे.

whatsapp to end support for these ios users includes ios 10 ios 11 iphone 5 and iphone
उमरानला इतके प्रेम दिल्याबद्दल देशाचा आभारी, वडिलांची भावूक प्रतिक्रिया

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com