WhatsApp in Android : आता 'या' अँड्रॉईड फोनमध्ये चालणार नाही व्हॉट्सअ‍ॅप; संपूर्ण यादी समोर

सोबतच जुन्या iOS म्हणजे, आयफोनवर देखील व्हॉट्सअ‍ॅप वापरता येणार नाही.
WhatsApp in Android
WhatsApp in AndroideSakal

जगातील सर्वात लोकप्रिय मेसेजिंग अ‍ॅप्सपैकी एक असणाऱ्या व्हॉट्सअ‍ॅपने आपल्या यूजर्सना मोठा धक्का दिला आहे. ठराविक अँड्रॉईड डिव्हाईसमध्ये आता व्हॉट्सअ‍ॅप सपोर्ट बंद होणार आहे. सोबतच जुन्या iOS म्हणजे, आयफोनवर देखील व्हॉट्सअ‍ॅप वापरता येणार नाही.

एबीपीने दिलेल्या वृत्तानुसार, 24 ऑक्टोबरपासून व्हॉट्सअ‍ॅप जुन्या डिव्हाईसचा सपोर्ट काढून घेणार आहे. यामध्ये अँड्रॉईड 4.1 व्हर्जन आणि त्यामागच्या सर्व अँड्रॉईड डिव्हाईसचा समावेश आहे. यूजर्सच्या सुरक्षेसाठी हा निर्णय घेण्यात आल्याचं कंपनीकडून सांगण्यात आलं आहे.

WhatsApp in Android
WhatsApp Ads : पैसे कमावण्यासाठी मेटाचा नवा फंडा, आता व्हॉट्सअ‍ॅपवरही दिसणार जाहिराती? काय म्हणाली कंपनी?

कोणत्या स्मार्टफोनचा समावेश?

कंपनीने अशा सर्व स्मार्टफोनची यादी प्रसिद्ध केली आहे, ज्यामध्ये आता व्हॉट्सअ‍ॅप सपोर्ट करणार नाही. ही यादी पुढीलप्रमाणे -

  • सॅमसंग गॅलेक्सी नोट 2

  • सॅमसंग गॅलेक्सी एस 2

  • सॅमसंग गॅलेक्सी नेक्सस

  • सॅमसंग गॅलेक्सी टॅब 10.1

  • सोनी एक्सपीरिया झे

  • सोनी एक्सपीरिया एस 2

  • सोनी एरिक्सन एक्सपीरिया आर्क 3

  • मोटोरोला ड्रॉईड रेजर

  • मोटोरोला झूम

  • एलजी ऑप्टिमस झी प्रो

  • एलजी ऑप्टिमस 2X

  • एचटीसी वन

  • एचटीसी सेन्सेशन

  • एचटीसी डिझायर एचडी

  • नेक्सस 7

अँड्रॉईड सोबतच जुन्या iOS डिव्हाईसवर देखील व्हॉट्सअ‍ॅपचा सपोर्ट बंद होणार आहे. जर तुम्हाला तुमच्या फोनमध्ये व्हॉट्सअ‍ॅप सुरू ठेवायचं असेल, तर त्वरीत आपलं अँड्रॉईड हे 5.0 किंवा त्याहून पुढच्या व्हर्जनवर अपडेट करून घ्यावं लागेल. तसंच आयफोन यूजर्सना iOS 12 किंवा त्यापुढील व्हर्जन घ्यावं लागेल.

WhatsApp in Android
WhatsApp New Feature : मित्रांचा मोठा ग्रुपच करु शकणार व्हॉट्सअ‍ॅप कॉलिंग; काय आहे नवीन फिचर?

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com