esakal | यापुढे या फोनमध्ये काम करणार नाही व्हॉट्सअ‍ॅप; अशा पद्धतीने करा चॅट्स बॅकअप
sakal

बोलून बातमी शोधा

WhatsApp will no longer work in this phone

वर्तमानमध्ये iPhone 4s सध्या iOS 9  वर काम करीत आहेत. या सीरीज़मध्ये कंपनीने  iOS 10 दिलेला नाही. हे दर्शविते की iPhone 4s  किंवा पूर्वीचे मॉडेल चालवणारे यूज़र्स यापुढे व्हॉट्सॲप चालवण्यास सक्षम नसतील.

यापुढे या फोनमध्ये काम करणार नाही व्हॉट्सअ‍ॅप; अशा पद्धतीने करा चॅट्स बॅकअप

sakal_logo
By
सुस्मिता वडतिले

पुणे : व्हॉट्सअ‍ॅपने Apple  यूज़र्ससाठी iOS 9 किंवा त्याहून अधिक जुन्या ऑपरेटिंग सिस्टीमवर फोन चालवत असलेले सपोर्ट बंद केले आहे. कंपनीने आपल्या FAQ पेजवर ही माहिती दिली आहे. व्हॉट्सअॅप मधून जुन्या (OS वर्ज़न) ओएस आवृत्त्यांसाठी सपोर्ट काढून टाकते. यावेळी आयओएस यूज़र्सची वेळ आली आहे. कंपनीने आपल्या एफएक्यू पेजवर स्पष्टपणे लिहिले आहे की Apple डिव्हाईस  iOS 9  किंवा त्याहून जुन्या iOS वर कार्य करत असलेल्या डिव्हाइस सपोर्ट करणार नाही. याचा अर्थ असा की आपल्याला सॉफ्टवेअर वर्ज़नला iOS 10  किंवा त्यापेक्षा उच्च आवृत्तीवर अपडेट करण्याची आवश्यकता असेल.

व्हॉट्सअ‍ॅपने आपल्या FAQ पेजवर म्हटले आहे की, व्हॉट्सॲप  यापुढे iOS 9 किंवा पूर्वीचे वर्ज़नवर सपोर्ट करणार नाही. आयफोनवर व्हॉट्सअ‍ॅप वापरण्यासाठी तुमच्या फोनवर iOS10  किंवा त्यानंतरचा असणे आवश्यक आहे. व्हॉट्सॲपने आपल्या एफएक्यू पेज वर लिहिले आहे की, व्हॉट्सॲपच्या सर्व फीचर्सचा अधिक चांगला अनुभव घेण्यासाठी आपण आपल्या फोनवर  iOSची नवीन वर्ज़न वापरण्याची शिफारस केली आहे. तुमच्या IPhoneचा  सॉफ्टवेयर अपडेट करण्यासाठी Apple Support वेबसाइट वर जावा. 

इतकेच नाही तर व्हॉट्सॲपने पुढे असेही लिहिले की 'आम्ही जेलब्रोन आणि अनलॉक केलेले डिवाइस वापरण्यास मनाई देत नाही. तथापि हे बदल आपल्या डिव्हाइसच्या कार्य करण्याच्या क्षमतेवर परिणाम करू शकतात. आम्ही अशा फोनला सपोर्ट देत नाही जे आयफोनच्या ऑपरेटिंग सिस्टमची मॉडिफाइड वर्ज़न  वापरतात.'

वर्तमानमध्ये iPhone 4s सध्या iOS 9  वर काम करीत आहेत. या सीरीज़मध्ये कंपनीने  iOS 10 दिलेला नाही. हे दर्शविते की iPhone 4s  किंवा पूर्वीचे मॉडेल चालवणारे यूज़र्स यापुढे व्हॉट्सॲप चालवण्यास सक्षम नसतील. आपण iPhone 5 च्या आधी मॉडेल देखील वापरत असल्यास, तुम्ही तुमच्या गप्पांचा आयकॉलाडमध्ये बॅकअप घ्या. यानंतर तुम्ही नवीन व्हर्जन डिव्हाइसमध्ये रीस्टोर (पुनर्संचयित) करू शकता.

iCloud वर WhatsAppचा बॅकअप कसा घ्यावा

  • आपण खाली नमूद केलेल्या स्टेप्सचा वापर करून आपल्या व्हॉट्सॲप चॅट्सला iCloudवर बॅकअप घेऊ शकता आणि त्या एका नवीन डिव्हाइसवर रीस्टोर करू शकता.
  • तुमच्या चॅटचा कधीही मॅन्युअल बॅकअप घेण्यासाठी तुम्हाला WhatsApp च्या 'Settings' वर जावे लागेल आणि तेथे 'Chats' वर टॅप करा. त्यानंतर 'Chat Backup' वर टॅप करा आणि  'Back Up Now'  वर टॅप करा.
loading image
go to top