आता व्हॉ़ट्ऍपवरुन करता येणार व्हिडिओ कॉल

वृत्तसंस्था
बुधवार, 16 नोव्हेंबर 2016

व्हॉट्सऍपवरील व्हॉईस कॉलची सुविधा चांगलीच लोकप्रिय झाली त्यानंतर व्हिडीओ कॉल साठी देखील वारंवार मागणी येत होती. चांगले नेटवर्क नसताना देखील याचा वापर करता यावा यासाठी आम्ही प्रयत्न करत होतो. मार्क झुकरबर्ग

मेन्लोपार्क - फेसबुक वरुन काल (मंगळवार) मार्क झुकरबर्ग यांनी व्हॉट्सअॅपची बहुप्रतीक्षित व्हिडिओ कॉलिंग सेवा सुरु झाल्याची घोषणा केली.

ऍन्ड्रॉइड, आयफोन आणि विंडोज अशा सर्व प्रकारच्या फोनसाठी ही सुविधा असणार आहे. आपले व्हॉट्सऍप अपडेट केल्यानंतर युजर्सना ही सुविधा उपलब्ध होणार आहे. आयेफोन युजर्ससाठी ही सुविधा मोफत असुन, ऍन्ड्रॉइड आणि विंडोज युजर्सला कंपनीच्या डेटानुसार व्हिडिओ कॉलिंगसाठी इंटरनेटचा दर लागू होणार आहे. 

हे नवीन फिचर वापरताना ज्या व्यक्तिला व्हिडीओ कॉल करायच आहे त्याचे चॅट ओपन करुन त्यातला फोनच्या आयकॉनवर क्लिक करा. आणि व्हिडीओचा ऑप्शन निवडा.

 

 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: WhatsApp Video Calling Launched