व्हॉट्सअॅप आणतंय जबरदस्त फिचर

वृत्तसंस्था
शनिवार, 29 जुलै 2017

व्यावसायिकांसाठी खास अ‍ॅप
व्हॉट्सअॅप व्यावसायिकांसाठी देखील एक अ‍ॅप तयार करत आहे. त्याचे देखील सध्या टेस्टींग सुरू आहे. व्हॉट्सअॅप व्यावसायिकांसाठीच्या अ‍ॅपमध्ये व्यावसायिक लोक आणि ग्राहक एकमेकांशी सोप्या पद्धतीने संवाद साधू शकणार आहेत.

व्हॉट्सअॅप सतत आपल्या यूजर्ससाठी नवनवीन फिचर्स आणत असते. तोच प्रयत्न कायम ठेवत आता व्हॉट्सअॅप एका नवीन फिचर आणण्याच्या तयारीत आहे. व्हॉट्सअॅप नवीन फिचरवर काम करत असून त्याबाबत सध्या काम सुरू आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार,  या फिचरमुळे यूजर्सचा व्हॉईस कॉल सुरू असताना तो व्हिडिओ कॉलवर स्विच करू शकणार आहे. म्हणजेच आता व्हॉईस कॉलमधून व्हिडिओ कॉलमध्ये स्विच होताना तुमचा कॉल बंद होणार नाही. अर्थातच कॉल डिस्कनेक्ट करण्याचीही गरज पडणार नाही.

आता देखील व्हॉट्सअॅप व्हिडिओ कॉलची सुविधा देते आहे. मात्र नवीन येऊ घातलेले फिचर त्यात नाही. म्हणजेच व्हॉईस कॉलमधून व्हिडिओ कॉलमध्ये स्विच होण्याचे त्यात फिचर नाही. त्यामुळे आपण व्हॉईस कॉल केला असेल आणि अचानक आपल्याला व्हिडिओ कॉल करायचा असल्यास आधी व्हॉईस कॉल डिस्कनेक्ट होतो आणि त्यानंतर पुन्हा व्हिडीओ कॉल करावा लागतो. आता आपण थेट व्हॉईस कॉलमधून व्हिडिओ कॉलमध्ये जाऊ करू शकणार आहोत. सध्या बीटा व्हर्जनवर याचे टेस्टींग सुरू आहे.

व्यावसायिकांसाठी खास अ‍ॅप
व्हॉट्सअॅप व्यावसायिकांसाठी देखील एक अ‍ॅप तयार करत आहे. त्याचे देखील सध्या टेस्टींग सुरू आहे. व्हॉट्सअॅप व्यावसायिकांसाठीच्या अ‍ॅपमध्ये व्यावसायिक लोक आणि ग्राहक एकमेकांशी सोप्या पद्धतीने संवाद साधू शकणार आहेत. मात्र या अ‍ॅपबद्दल अजून काही अधिकॄत घोषणा करण्यात आलेली नाही.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: WhatsApp Video to Voice Call Switch Spotted, New App for Businesses Tipped