व्हॉट्सऍप लगेच अपडेट करा, नाहीतर...

वृत्तसंस्था
मंगळवार, 14 मे 2019

यूजर्सनी मोबाईल ऑपरेटिंग सिस्टीमप्रमाणेच व्हॉट्‌सऍपचे लेटेस्ट व्हर्जन देखील अपडेट करावे, आमच्या यूजर्सची खासगी माहिती सुरक्षित राहावी म्हणून आम्ही या क्षेत्रातील आमच्या भागीदारांसोबत काम करत आहोत, असे कंपनीच्या प्रवक्‍त्याने माध्यमांशी बोलताना सांगितले.

न्यूयॉर्क : जगातील आघाडीचे मेसेजिंग ऍप व्हॉट्‌सऍपने आता वाईट स्पायवेअरचा धसका घेतला असून, कंपनीने आपल्या यूजर्सना त्यांचे ऍप अपडेट करण्याच्या सूचना दिल्या आहेत. यूजर्सच्या स्मार्टफोनमध्ये अनावधानाने अपलोड झालेल्या या स्पायवेअरमुळे फोनमधील माहितीला धोका निर्माण झाला असून, यामुळे यूजर्सनी त्यांचे ऍप अपडेट करावे असे व्हॉट्‌सऍपने म्हटले आहे. 

यूजर्सनी मोबाईल ऑपरेटिंग सिस्टीमप्रमाणेच व्हॉट्‌सऍपचे लेटेस्ट व्हर्जन देखील अपडेट करावे, आमच्या यूजर्सची खासगी माहिती सुरक्षित राहावी म्हणून आम्ही या क्षेत्रातील आमच्या भागीदारांसोबत काम करत आहोत, असे कंपनीच्या प्रवक्‍त्याने माध्यमांशी बोलताना सांगितले. संबंधित हल्लेखोर यूजर्सना व्हीओआयपी कॉल करतात. हा कॉल उचलला नाही तरीसुद्धा तो स्पायवेअर फोनमध्ये आपोआप इन्स्टॉल होतो. सायबर क्षेत्रातील आघाडीची इस्रायली कंपनी "एनएसओ' ग्रुपने हे स्पायवेअर तयार केले आहे.

याबाबत माध्यमांनी एनएसओकडे विचारणा केली असता कंपनीच्या सूत्रांनी सांगितले, की सरकारच्या मान्यताप्राप्त तपास संस्थांकडे या तंत्रज्ञानाच्या वापराचा परवाना देण्यात आलेला आहे. दहशतवाद आणि गुन्हेगारी रोखण्यासाठीच आम्ही हे ऍप तयार केले असून, ते स्वत:हून काम करत नाही. या स्पायवेअरच्या गैरवापराबाबतच्या आरोपांची चौकशी करून दोषींवर कारवाई केली जाईल. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: WhatsApp wants users to upgrade app urgently