'या' खास फीचरसाठी व्हॉट्‌सऍप लवकरच आणणार एक शानदार अपडेट! जाणून घ्या काय आहे नवीन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

"या' खास फीचरसाठी व्हॉट्‌सऍप लवकरच आणणार एक शानदार अपडेट! जाणून घ्या काय आहे नवीन

आतापर्यंत व्हॉट्‌सऍप मेसेज आपोआप डिलीट होण्यासाठी जास्तीत जास्त सात दिवसांचा अवधी लागत होता, पण आता तसे नाही.

'या' खास फीचरसाठी व्हॉट्‌सअ‍ॅप लवकरच आणणार एक शानदार अपडेट !

व्हॉट्‌सऍपने (WhatsApp) गेल्या वर्षी वापरकर्त्यांसाठी डिसअपियरिंग (अदृश्‍य) (Disappearing) मेसेज सुविधा आणली होती. या फीचरद्वारे युजर्स आपोआप डिलीट झालेले मेसेज पाठवू शकतात. डिसअपियरिंग मोडसह पाठवलेले संदेश उघडल्यानंतर ते आपोआप हटवले जातात. आता कंपनी या फीचरमध्ये काही बदल करत आहे. आतापर्यंत व्हॉट्‌सऍप मेसेज आपोआप डिलीट होण्यासाठी जास्तीत जास्त सात दिवसांचा अवधी लागत होता, पण आता तसे नाही.

स्मार्टफोन वापरून

हेही वाचा: तुमच्या कंप्युटरची इंटरनेट स्पीड स्लो झालीय, मग या ट्रिक्स वापरून पाहा

90 दिवसांची कालमर्यादा असू शकते डिसअपियरिंग होणाऱ्या संदेशाची

WABetaInfo च्या मते, कंपनी लवकरच या फीचरमध्ये मोठा बदल करण्याची तयारी करत आहे. असे सांगितले जात आहे की, लवकरच कंपनी डिसअपियरिंग मोडमध्ये पाठविलेले संदेश स्वयंचलितपणे हटवण्याची वेळ 7 दिवसांवरून 90 दिवसांची करणार आहे.

डिसअपियरिंग संदेशांसाठी तीन पर्याय

WABetaInfo ने अँड्रॉइड बीटा व्हर्जन 2.21.9.6 अपडेटमध्ये व्हॉट्‌सऍपचे हे नवीन फीचर शोधले आहे. WABetaInfo ने शेअर केलेल्या स्पीड पोस्टमध्ये असे दिसून आले आहे की, अपडेट केल्यानंतर वापरकर्त्यांना डिसअपियरिंग मोडमध्ये संदेश पाठवण्यासाठी 24 तास, 7 दिवस आणि 90 दिवस असे तीन मोड मिळू शकतात.

गेल्या वर्षी देखील शोधला होता 24-तासांचा पर्याय

गेल्या वर्षी एप्रिलमध्ये WABetaInfo च्या लक्षात आले, की व्हॉट्‌सऍप मेसेज डिसअपियर होण्यासाठी 24 तासांच्या टाईम फ्रेमवर काम करत आहे. तथापि, कंपनीने स्टेबल व्हर्जनसाठी रोलआउट केले नव्हते. आतापर्यंत, कंपनी संदेश डिसअपियरिंग होण्यासाठी ऑन-ऑफ टॉगल देते आणि ती संदेशाची डिफॉल्ट सेटिंग 7 दिवस डिसअपियरिंग ठेवते.

Web Title: Whatsapp Will Soon Bring A Great Update For Users

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :viralupdateTechnical