
व्हॉट्सअॅप हे जगातील सर्वात लोकप्रिय चॅटिंग अॅप्सपैकी एक आहे. भारतात देखील याचे कोट्यवधी यूजर्स आहेत. बऱ्याच वेळा व्हॉट्सअॅपवर चॅट करताना एखाद्या व्यक्तीला पाठवायचा मेसेज चुकून एखाद्या ग्रुपमध्ये पाठवला जातो. तुमच्याकडूनही तसं होत असेल, तर ही बातमी तुमच्यासाठी आहे.
व्हॉट्सअॅप आता एक नवीन अपडेट देणार आहे. यामुळे ग्रुप चॅट्स आणि पर्सनल चॅट्स हे वेगवेगळे दिसणार आहेत. Wabetainfo वेबसाईटने याबाबतची माहिती दिली आहे. याचा सर्व यूजर्सना मोठा फायदा होणार आहे.
या वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, व्हॉट्सअॅपवर चॅट्स आता चार कॅटेगरीमध्ये दिसतील. यामध्ये All, Unread, Contacts आणि Group अशा कॅटेगरींचा समावेश आहे. यात Unread कॅटेगरीत तुम्ही न वाचलेले मेसेज वेगळे दिसतील.
यासोबतच, पर्सनल मेसेज आणि ग्रुप मेसेज वेगवेगळे दिसत असल्यामुळे, यूजर्सना मोठा फायदा होईल. सर्व एकाच ठिकाणी असल्यामुळे चॅट्स शोधण्यात होणारी अडचण सुटणार आहे. सोबतच, इकडचे मेसेज तिकडे जाण्याचा धोकाही टळणार आहे.
हे फीचर सध्या केवळ व्हॉट्सअॅपच्या बीटा यूजर्ससाठी उपलब्ध आहे. याची चाचणी सुरू असून, लवकरच ते सर्व यूजर्ससाठी उपलब्ध होईल अशी शक्यता आहे. Beta Android 2.23.19.7 या अपटेडमध्ये हे फीचर दिसून येत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.