
तुमचा मोबाईल हा एक अमूल्य दागिना झाला आहे
कारण आपली ए टू झेड सगळी माहिती त्यातच असते
पण आपल्या काही चुकांमुळे मोबाईल हॅकरच्या निशाण्यावर येतो
आजच्या डिजिटल युगात मोबाइल फोन हा आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनला आहे. पण याच मोबाइल डिव्हाइसेस हॅकर्ससाठी सोन्याची खाण ठरत आहेत. स्टॅटिस्टाच्या अहवालानुसार, 2023 च्या शेवटच्या तिमाहीत 80 लाख डेटा चोरीच्या घटना नोंदवल्या गेल्या ज्यामुळे व्यवसायांना सरासरी 4.45 दशलक्ष डॉलर्सचा फटका बसला. यामागचे कारण जाणून तुम्हालाही शॉक करेल. मोबाइल डिव्हाइसेसवरील संवेदनशील माहिती जसे की पासवर्ड, कॉर्पोरेट ईमेल्स आणि वैयक्तिक डेटा, हॅकर्ससाठी सहज उपलब्ध आहे.