esakal | स्मार्टफोन विकताना...
sakal

बोलून बातमी शोधा

smartphone

स्मार्टफोन विकताना...

sakal_logo
By
पंकजा देव

स्मार्टफोनची नवनवीन मॉडेल्स बाजारात दाखल होत असतात. नवीन फोन खरेदी करण्याची अनिवार ओढ जाणवू लागते. जुना फोन विकण्याचे प्रयत्न सुरू होतात. तुम्हीही याच प्रयत्नात असाल तर खालील काही मुद्दे विचारात घेऊनच निर्णय घ्या. 

मोबाईलच्या प्रत्येक मॉडेलमध्ये काहीतरी नवीन देण्याचा प्रयत्न होत असतो. साहजिकच या नवीन फीचर्सची भुरळ पडते आणि आपला फोन कालबाह्य वाटू लागतो. 

- स्मार्टफोन विकण्याआधी फॅक्‍टरी रिसेट करण्याची दक्षता तुम्ही घेतली असेलच. ही काळजी घेतली तर कोणीही आपला पर्सनल डाटा मिळवू शकत नाही. मात्र कोणीही अधिक डोके लढवून डाटा रिकव्हर करू नये, यासाठी आणखीही काही दक्षता बाळगा. 

- फोन विकण्याआधी त्यातील जी-मेल आणि सर्व सर्व्हिसेस लॉग आउट करा. 
- त्यानंतर सेटिंग्जमध्ये स्मार्ट फोन इन्क्रिप्ट हा पर्याय निवडा. यामुळे तुमचा डाटा इन्क्रिप्ट होईल. 
- यानंतर कोणी तुमचा डाटा रिकव्हर केला तरी तो इन्क्रिप्टेड असेल. तो कोणीही वाचू शकणार नाही. 
- इन्क्रिप्शन केल्यानंतर फोन फॅक्‍टरी रिसेट करा. यावेळी क्‍लीन वाईप व्हायला हवे. 
- यासाठी तुम्ही ऍपचादेखील वापर करू शकता. तुम्ही अँटी थेफ्ट ऍप डाऊनलोड करून घेऊ शकता. याद्वारे स्मार्टफोनमधील डाटा डिलीट करता येतो. 
- डबल सिक्‍युरिटी हवी असेल तर रिसेट केल्यावर फोनमध्ये जंक फाईल्स सेव्ह करा आणि पुन्हा फाईल्स इन्क्रिप्ट करा. यानंतर फॅक्‍टरी रिसेट करा. ही प्रणाली अवलंबल्यास एखाद्याने डाटा रिकव्हर केला तरी त्याला केवळ जंक फाइल्सच मिळतील. 

loading image