
Mark Zuckerberg: सिलिकॉन व्हॅलीत सध्या एआय टॅलेंट वॉर सुरू आहे. त्यापार्श्वभूमीवर मेटाकडून दिग्गजांना कंपनीत घेण्यास सुरुवात करण्यात आलीय. मेटाचे संस्थापक मार्क झुकरबर्ग यांनी आता एका २४ वर्षीय तरुणाला मोठी ऑफर दिलीय. सुरुवातीला दिलेली ऑफर तरुणाने धुडकावून लावली होती. आता त्याला तब्बल २१९६ कोटींची ऑफर देऊन कंपनीत घेतलंय. एआय रिसर्चर मॅड डाइटके असं तरुणाचं नाव आहे.