World Meteorological Day : हवामान विभागाचे अंदाज का चुकतात ?

मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवलेली असताना नेमकं त्याच दिवशी कडकडीत ऊन पडावं आणि पाऊस गेला की काय असं वाटत असताना नेमक्या त्याच वेळी पावसाची रिमझिम व्हावी.
World Meteorological Day
World Meteorological Day google

मुंबई : आज २३ मार्च, जागतिक हवामान दिन. हवामानाचा सामान्य माणसाशी थेट संबंध येतो. कधी ऊन तर कधी पाऊस. सततच्या बदलत्या हवामानाला सामान्य माणूस कंटाळलेला आहे.

दोन महिन्यांत पावसाळा सुरू होईल. या काळात हवामान विभागाने वर्तवलेले अंदाज सर्वाधिक महत्त्वाचे ठरतात. मात्र बऱ्याचदा याबाबतचा सामान्य माणसाचा अनुभव फारसा चांगला नसतो.

मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवलेली असताना नेमकं त्याच दिवशी कडकडीत ऊन पडावं आणि पाऊस गेला की काय असं वाटत असताना नेमक्या त्याच वेळी पावसाची रिमझिम व्हावी. हे असं का होतं ? अत्याधुनिक उपकरणांचा वापर करणाऱ्या हवामान विभागाचे अंदाज का चुकतात ? (Why are the predictions of the weather department mostly wrong World Meteorological Day) हेही वाचा - अदानी..हिंडेनबर्ग आणि भविष्य....

World Meteorological Day
Social Media : मुलांच्या परवानगीशिवाय त्यांचे फोटो शेअर करणारे पालक जाणार तुरुंगात

हवामान विभागाने पहिल्या टप्प्यात वर्तवलेला देशभराचा अंदाज आणि प्रत्यक्ष स्थिती यांत ५ टक्क्यांचा कमी-अधिक फरक असतो. दुसऱ्या टप्प्यात मध्य, दक्षिण, वायव्य आणि ईशान्य अशा चार भागांत देशाचा अंदाज वर्तवला जातो. यात १५ ते २० टक्क्यांचा फरक असतो.

जेवढा भूभाग लहान तेवढा फरक अधिक. अंदाज आणि प्रत्यक्ष स्थितीमध्ये फरक असेल तर त्या अंदाजाचा फायदा होत नाही. भविष्यात जसजसे तंत्रज्ञान विकसित होत जाईल तसतसे हा फरक कमी होऊन राज्याचे अंदाज वर्तवता येतील.

World Meteorological Day
Pelvic Floor : योनिचे स्नायू बळकट करण्यासाठी करा ही योगासने

दोन वर्षांपूर्वी महाराष्ट्रात काही ठिकाणी गारपीट झाली. रायगडमध्ये निसर्ग चक्रिवादळ आले होते. याचा अंदाज आधीच वर्तवल्यामुळे सरकारला आपत्कालीन व्यवस्था सज्ज ठेवता आली. १९९९ साली ओरिसामध्ये चक्रिवादळ आले असता त्यात १० हजार लोक दगावले होते.

त्यानंतर २०१३ साली आलेल्या चक्रिवादळात मात्र ४० ते ५० लोक दगावले. हे तंत्रज्ञानाच्या प्रगतीचे यश आहे. जेव्हा हवामानात तीव्र बदल होतात तेव्हा अंदाज चुकू शकतो. उत्तराखंडमध्ये झालेली ढगफुटीची घटना तीव्र हवामान बदलामुळे झाली होती.

तिसऱ्या स्तरावरील आपत्तीचा अंदाज वर्तवलेला असताना दुसऱ्या स्तरावरील आपत्ती येणे बरे, असे मानले जाते. कारण त्यादृष्टीने यंत्रणा तयार असतात.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com