Geyser Precaution Tips : हिवाळ्यात गिझरची सर्व्हिसिंग गरजेची, अन्यथा होऊ शकते मोठी दुर्घटना

Bathroom Geyser : गिझरची सर्व्हिसिंग केल्यामुळे त्याचं आयुष्य वाढतं, आणि सोबतच अपघात होण्याचा धोका देखील कमी होतो.
Geyser Precaution Tips
Geyser Precaution TipseSakal

हिवाळ्यामध्ये गरम पाण्यासाठी कित्येक घरांमध्ये गिझरचा वापर केला जातो. मात्र, गाडी किंवा एसी प्रमाणेच गिझरची देखील सर्व्हिसिंग करणं गरजेचं असल्याचं बऱ्याच जणांना लक्षात येत नाही. असं न केल्यास, मोठी दुर्घटना होण्याचा धोका असतो.

कित्येक घरांमध्ये उन्हाळ्यात किंवा पावसाळ्यात गिझरचा जास्त वापर होत नाही. अशात हिवाळ्यात अचानक वापर वाढल्यामुळे त्यावर ताण येऊ शकतो. गिझरची सर्व्हिसिंग केल्यामुळे त्याचं आयुष्य वाढतं, आणि सोबतच अपघात होण्याचा धोका देखील कमी होतो.

Geyser Precaution Tips
Geyser Buying Guide : नवीन गिझर खरेदी करण्यापूर्वी 'या' गोष्टी लक्षात घ्या; अन्यथा करावा लागेल पश्चाताप

गिझरचा स्फोट

बऱ्याच वेळा आपण गिझरचा स्फोट होऊन दुर्घटना झाल्याच्या घटना ऐकतो. यामध्ये कित्येकांना आपल्या प्राणाला देखील मुकावं लागलं आहे. अगदी स्फोट नाही झाला, तरी गिझरमधील गॅस लीक होऊन, श्वास कोंडला जाऊनही दुर्घटना घडल्याचे प्रकार समोर आले आहेत. त्यामुळेच गिझरची तपासणी आणि सर्व्हिसिंग महत्त्वाची ठरते.

कोणत्याही गिझरमध्ये आउटर सेल, इनर टँक आणि हीटिंग युनिट असे विविध भाग असतात. या सर्व गोष्टींची वेळोवेळी तपासणी करणं गरजेचं आहे. इलेक्ट्रिक गिझरमध्ये वायरिंगची तपासणी होणं गरजेचं आहे. वर्षातून किमान दोन वेळा गिझरची नियमित सर्व्हिसिंग करणं जास्त खर्चिकही नाही. (Tech News)

Geyser Precaution Tips
Heater for Home : यंदाच्या हिवाळ्यात घराला ठेवा गरम; स्वस्तात मिळतायत मस्त हीटर! पाहा बेस्ट ऑप्शन

एक्सपर्टची मदत

गिझरची सर्व्हिसिंग करण्यासाठी तुम्ही जिथून गिझर घेतला त्या दुकानदाराशी संपर्क साधू शकता. किंवा आजकाल ऑनलाईन देखील अशा प्रकारची सेवा पुरवणाऱ्या कंपन्यांकडून तुम्ही एखाद्या एक्सपर्टला घरी बोलवू शकता. शक्यतो कंपनीच्या माणसाकडूनच गिझर सर्व्हिसिंग करून घेण्याचा प्रयत्न करा, ज्यामुळे तुमच्या सुरक्षेची हमी राहील.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com