
सिमकार्डचा एक कोपरा का कापला जातो? SIM डिझाईनची खास गोष्ट
काळाच्या ओघात मोबाईल फोन माणसासाठी खूप महत्त्वाचा बनत चालला आहे. पूर्वी जेव्हा फिचर फोन होते, तेव्हा फोनचा वापर फक्त कॉल करण्यासाठी आणि घेण्यासाठी केला जात होता, परंतु जेव्हापासून स्मार्टफोनने त्याची जागा घेतली आहे, तेव्हापासून मोबाइल (Mobile) फोनचा वापर कॉल करण्याव्यतिरिक्त इतर गोष्टींसाठी खूप केला जाऊ लागला आहे. मात्र सिमकार्डशिवाय मोबाईल फोनचा उपयोग नाही. सिमकार्ड (Sim Card) मोबाईलचा प्राण आहे. पण तुम्हाला माहित आहे का की सिमकार्ड एका कोपऱ्यातून कापलं का जाते? (Why SIM cards cut in one corner? interesting thing related to the design of SIM)
हेही वाचा: 1000GB डेटा अन् मोफत कॉलिंग फक्त 329 रुपयांमध्ये; 'या' कंपनीचा खास प्लॅन
जर तुम्ही सिम कार्ड पाहिले असेल, तर तुमच्या लक्षात आले असेल की ते एका कोपऱ्यातून कापलेले असते. याचे कारण काय आहे याचा कधी विचार केला आहे का? काही वर्षांपूर्वीपर्यंत सीडीएमए तंत्रज्ञानाचे फोन होते ज्यामध्ये सिमचा समावेश नव्हता. पण नंतर जेव्हा सिम येऊ लागले म्हणजेच जीएसएम तंत्रज्ञान वापरले जाऊ लागले, तेव्हा सिमची रचना आयताच्या आकारात होती. या तंत्राद्वारे सिम टाकण्याची आणि काढून टाकण्याची गरज भासू लागली.
सिमकार्डची उजवी बाजू ओळखणे अवघड होते-
त्यावेळच्या सिममध्ये कॉर्नर कापले जात नव्हते. मग सिम काढणे आणि स्थापित करणे खूप कठीण होते. इतकेच नाही तर सिमची सरळ आणि उलट बाजू कोणती आहे हे देखील लोकांना समजत नसे. अशा परिस्थितीत लोकांना सिमशी संबंधित अनेक समस्या भेडसावत होत्या. मग नेटवर्क प्रदात्यांनी सिमसाठी वेगळे डिझाइन ठरवले. सिम मोबाईलमध्ये बसवून काढता यावा म्हणून सिमचा एक कोपरा कापला.
हेही वाचा: दिवाळखोर 'किआ' भारतात कशी झाली सुपरहिट?
सिम कार्ड बसवण्यासाठी केले बदल-
सिम व्यतिरिक्त मोबाईलमध्ये सिम कुठे बसवायचे याचे डिझाईनही बदलण्यात आले. असा एक स्लॉट देखील होता ज्यामध्ये सिम सहज बसू शकेल आणि ते काढण्यासाठी एक जागा राहिल जेणेकरून ते काढता येईल. टेलिकॉम कंपन्यांच्या (Telecom Companies) या व्यवस्थेमुळे लोकांना लोकांची सोय झाली. फोनमध्ये पाहिले तर उजव्या बाजूने सिम कार्ड ट्रेमध्येही सिम ठेवण्याची खूण असते.
Web Title: Why Sim Cards Cut In One Corner Interesting Thing Related To The Design Of Sim
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..