
दिवाळखोर 'किआ' भारतात कशी झाली सुपरहिट?
Story of Kia Car Company: अलीकडच्या काळात कार खरेदीकडे भारतीयांचा कल वाढलाय. सध्या अनेक कंपन्या विविध सेग्मेंटमध्ये दमदार गाड्या लाँच करत आहेत. लोक त्यांना पसंतही करत आहेत. आज आपण अशा एका कंपनीबद्दल बोलणार आहोत, जी कंपनी एकेकाळी दिवाळखोर ठरली होती. परंतु तिेने भारतात दमदार आगमण करून सर्व कार कंपन्यांना धक्का दिला. भारतीय कार बाजारात (Automobile Market) लोकप्रिय ठरलेली ही कार कंपनी म्हणजे 'किआ' (Kia).
किआ कार कंपनी एकेकाळी दिवाळखोर (Bankrupt) ठरली होती. परंतु जेव्हा ती भारतात लाँच झाली, तेव्हा केवळ एका वर्षाच्या काळात किआ कंपनीने हजारो कार विकल्या आणि तब्बल 4700 कोटींची उलाढाल केली. किआ कंपनी हे करू शकली ती खास स्ट्रॅटर्जीमुळे...
हेही वाचा: चीनमुळे चंद्रावर पडला ६५ फूट रुंद खड्डा

किआ कंपनीने आपलं पहिलं प्रॉडक्ट फेल जाऊ नये याची पुरेपुर काळजी घेतली. जर पहिले प्रॉडक्ट फेल गेलं तर पुन्हा कमबॅक अर्थात पुनरागमन करणे खूप कठीण होतं, कारण कंपनीवर तसा टॅग पडतो, हे किआने ओळखलं होते. त्यामुळे भारतात आपली पहिली कार लाँच करण्यापूर्वी किआने प्रचंड मेहनत घेतली. भारतातील परिस्थिती तसेच कार (Car) मार्केटचा अभ्यास केला. त्याचबरोबर लोकांची मानसिकताही समजून घेतली. यादरम्यान कंपनीच्या लक्षात आलं की जास्तीक जास्त भारतीय लोक 8-10 लाखांच्या आसपास किंमत असलेली आणि चांगली फिचर्स तसेच मायलेज असलेली कार खरेदी करणे पसंत करतात.

kia carens car
या होमवर्कनंतर कंपनीने भारतीयांच्या अपेक्षांवर काम करून आपली पहिली मिनी एसयूव्ही (mini SUV) लाँच केली, ही कार म्हणजे सध्याच्या टॉप सेलिंग कारपैकी एक असलेली किआ सॅल्टोज (Kia Saltos)...स्टायलिश, आकर्षक फिचर्सने युक्त अशा या कारने पहिल्याच दिवशी तब्बल 6000 बुकींग उचलली. पुढच्या तीनच महिन्यात तब्बल 8500 बुकींग मिळवली.
किआच्या या कामगिरीने भारतातील साऱ्या कार कंपन्यांचे होश उडवले. फक्त दोन वर्षात किआ कार कंपनी भारतातील टॉप 5 कंपन्याच्या यादीत सामाविष्ट झाली आहे. किआच्या सॉनेट (Sonet), सॅल्टोज (Saltos), कॅरन्स (Carens), कार्निव्हल (Carnival) या गाड्यांनी भारतात धूम माजवली आहे. खासकरून किआ सॅल्टोजने भारतीय कार बाजारपेठेत दबदबा निर्माण केला आहे. येत्या काळात किआची स्पोर्टेज (Kia Sportage) ही कारही लाँच होणार आहे.
Web Title: How Bankrupt Kia Car Company Become A Super Hit In India
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..