Winter Solstice 2023 : आज वर्षातील सर्वात लहान दिवस आणि मोठी रात्र, याचा शरीरावर काय होतो परिणाम?

आज Winter Solstice; वर्षातील सर्वात लहान दिवस अन् सर्वात मोठी रात्र
Winter Solstice 2023 : आज वर्षातील सर्वात लहान दिवस आणि मोठी रात्र, याचा शरीरावर काय होतो परिणाम?
Updated on

वैज्ञानिक व खगोलीय घटनांबद्दल सर्वसामान्यांमध्ये नेहमीच कुतूहल व उत्सुकता असते. आज, शुक्रवारी असाच अनोखा योग जुळून येणार आहे. अयनदिनामुळे आजचा दिवस या वर्षातील सर्वात लहान दिवस असून, रात्र सर्वात मोठी राहणार असल्याची माहिती, खगोल व पर्यावरण अभ्यासक प्रा. सुरेश चोपणे यांनी दिली.

प्रा. चोपणे यांच्या मते, वर्षातून दोनदा पृथ्वीवर अयनदिन घडत असतात. त्यात २१ व २२ डिसेंबरला दक्षिण अयनदिन, तर २१ व २२ जूनला उत्तर अयनदिन होतात. दोन्ही वेळा दिवसव रात्रीच्या वेळात मोठा बदल घडतो. २२ डिसेंबरला वर्षातील सर्वात लहान दिवस आणि मोठी रात्र असते.

तर २१ जूनला दिवस मोठा व रात्र लहान असते. पृथ्वी सूर्याभोवती भ्रमण करताना २३.५ अंशाने कललेली असते. त्यामुळेच पृथ्वीवर ऋतू बदलत असतात. तसेच उत्तरायण, दक्षिणायन आणि विषुवदिन घडत असतात. उत्तरायणाची कमाल मर्यादा कर्कवृत्त,

आजचा दिवस सर्वात लहान, रात्र मोठी!

तर दक्षिणायनाची मकरवृत्त असते. सूर्याच्या दक्षिणेकडून उत्तरेकडे जाण्याच्या भासमान मार्गाला उत्तरायण, तर उत्तरेकडून दक्षिणेकडे जाण्याचा मार्गाला दक्षिणायन म्हणतात.

२१ व २२ जूनला पृथ्वीचा उत्तर ध्रुव सूर्याकडे झुकलेला असतो, तर २१ व २२ डिसेंबरला पृथ्वीचा दक्षिण ध्रुव सूर्याकडे कललेला असतो. त्यामुळे आपल्याकडे सूर्याची किरणे लांब व तिरपी पडतात आणि तापमान कमी होते. रात्र मोठी व दिवस लहान होतो. याउलट २१ जूनला सर्वात मोठा दिवस आणि रात्र लहान असते.

माणसांच्या शरिरावर होतो परिणाम

खरे तर मानवी शरिराचे एक जैविक घड्याळ आहे. दिवस-रात्रीप्रमाणे ते देखील काम करीत असते. जेव्हा ह्यात बदल होतो, तेव्हा या घड्याळाला बदलावे लागते, ॲडजस्ट करावे लागते. अनेकदा जाणवत नसले तरी त्याचा शरीराला त्रास होतो. त्यामुळे झोपेचे वेळापत्रक बदलते, मूड बदलतो, डोकेदुखी व उदासीनता येते. पचनाच्या समस्याही उद्भवतात.

विविध शहरांतील आजचा दिवस

शहर दिवस रात्र

नागपूर १० तास ४८ मिनिटे २८ सेकंद १३ तास १२ मिनिटे ०३ सेकंद

चंद्रपूर १० तास ५३ मिनिटे १३ सेकंद १३ तास ०७ मिनिटे १७ सेकंद

मुंबई १० तास ५६ मिनिटे ३३ सेकंद १३ तास ०३ मिनिटे ५६ सेकंद

पुणे १० तास ५८ मिनिटे ४७ सेकंद १३ तास ०१ मिनिट ४३ सेकंद

दिवस-रात्र किती काळ

दक्षिण अयनदिन किंवा हिवाळी अयनदिनाला एकूण २४ तासांपैकी ११ तासांचा दिवस, तर १३ तासांची रात्र, असे ढोबळमानाने होत असले तरी वैज्ञानिकदृष्टीने पाहिल्यास प्रत्येक १०० किमी अक्षावर वेळात बदल होत असतो. पृथ्वी गोल असल्याने सूर्याची किरणे सारखीच सर्व ठिकाणी पडत नाहीत. अनेक वर्षांनंतर अयनदिन वेगळ्या दिवसाला (२१ व २२ डिसेंबर) येत असतात.

यावर्षी आयनदिन हा २२ डिसेंबरला भारतीय वेळेनुसार सकाळी ८.५७ ला होत आहे. ज्या वेळेला मकरवृत्तावर सूर्य येतो, ती वेळ किंवा पृथ्वीचा ध्रुव २३.५ अंश उत्तरेला कललेला असेल. ती वेळ अयनदिन ठरली जाते. परंतु दिवस-रात्रीच्या वेळा मात्र भिन्न असतात. यावर्षीचा आयनदिन २२ डिसेंबरला सकाळी येत असल्याने २१ आणि २२ डिसेंबरचे दोन दिवस अगदी थोड्या वेळेच्या फरकाने लहान दिवसाचा आणि मोठ्या रात्रीचा आनंद घेता येईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com