Bitcoin Scam : बिटकॉइनमध्ये गुंतवणूक पडली भलतीच महागात! महिलेने फेसबुकवरील जाहिरातीवर क्लिक केलं अन् गमावले 27 लाख

देशात इंटरनेटचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. याचात परिणाम म्हणजे ऑनलाईन फसवणूकीच्या घटना देखील वाढल्या आहेत.
woman lost Rs 27 Lakh in Bitcoin scam after clicking on Facebook ad marathi news
woman lost Rs 27 Lakh in Bitcoin scam after clicking on Facebook ad marathi news

देशात इंटरनेटचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. याचात परिणाम म्हणजे ऑनलाईन फसवणूकीच्या घटना देखील वाढल्या आहेत. महाराष्ट्रातील ढोकळी येथे ऑनलाइन फसवणुकीचे मोठे प्रकरण समोर आले आहे. ढोकळी येथे राहणाऱ्या ३३ वर्षीय महिलेला फेसबुकवरील लिंकवर क्लिक करणे चांगलेच महागात पडले.

बिटकॉइनमध्ये गुंतवणूक करून मोठ्या नफ्याचे आमिष दाखवत या महिलेला गंडा घालण्यात आला. फेसबुकवरील एका लिंकवर क्लिक करताच महिलेच्या खात्यातून २७ लाख रुपये गायब झाले. अशाप्रकारे ही महिला फेसबुकवर बिटकॉइन इनव्हेस्टमेंट स्कॅमचा बळी ठरली.

फसवणूक कशी सुरू झाली?

फेसबुकवर सहज ब्राउझ करत असताना, महिलेच्या एक जाहिरात दिसली. ज्यामध्ये असा दावा करण्यात आला होता की जे किमान $500 म्हणजेच अंदाजे 42,000 रुपये बिटकॉइनमध्ये गुंतवणूक करतात त्यांना भरपूर नफा मिळेल. गुंतवणूकदारांना त्यांच्या गुंतवणुकीच्या बदल्यात $4,800 मिळतील असा दावाही या जाहिरातीत करण्यात आला होता

महिलेने फेसबुकवर ही जाहिरात पाहिल्यानंतर झटपट पैसे कमावण्यासाठी जाहिरातीत दिलेल्या फोन नंबरवर संपर्क केला. फोनवरील व्यक्तीने स्वत:ची ओळख बेल्जियमचा नागरिक असल्याची करून दिली. तसेच महिलेचा विश्वास जिंकण्यासाठी खोटी माहिती दिली आणि भरपूर नफा मिळवून देण्याचे खोटे आश्वासन देखील दिले. तसेच कथित गुंतवणूक प्रक्रियेबद्दल देखील माहिती दिली.

woman lost Rs 27 Lakh in Bitcoin scam after clicking on Facebook ad marathi news
अजित पवार गटाची विदर्भातील 10 पैकी 3 जागांवर नजर; भाजप खासदार असलेल्या 'या' जागांवर सांगितला दावा

या प्रक्रियेचा एक भाग म्हणून तिला मोबाईल अॅप डाउनलोड करून प्रोफाईल तयार करण्यास सांगण्यात आले. याला वैध ठरवण्यासाठी फसवणूक करणार्‍याने महिलेला त्यांच्या यादीमध्ये घेतल्याचे दाखवण्यासाठी एक स्क्रीनशॉट देखील पाठविला.

सुरुवातीला त्याने Bitcoin मध्ये 50,000 रुपयांची गुंतवणूक केली आणि त्यावेळी एका लहान रकमेसाठी एक व्हेरिफिकेशन ईमेल देखील मिळाला. मुद्दाम शंका निर्माण करण्यासाठी हे करण्यात आलं. त्या महिलेला आणखी अडकवण्यासाठी भामट्याने एक वेबसाईट देखील दाखवली. यामध्ये त्याच्या गुंतवणुकीतून मिळालेला नफा दाखवण्यात आला. सहज पैसे कमावण्याच्या लालसेपोटी महिलेने अधिक माहिती शेअर केली.

woman lost Rs 27 Lakh in Bitcoin scam after clicking on Facebook ad marathi news
Weather Update : शेतकऱ्यांसाठी पुढील ४८ तास धोक्याचे! 'या' राज्यात कोसळणार अवकाळी पाऊस

भामट्याने महिलेला एक वेबसाईट दाखवली. ज्यामध्ये $4,586 चा नफा कमावल्याचे देखील दाखवण्यात आले. जो केलेल्या एकूण गुंतवणुकीचा विचार करता 3 लाख रुपयांहून जास्त होता. मात्र, त्यांनी वेबसाइटवर दिसलेले पैसे काढण्याचा प्रयत्न केला असता, आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले.

महिलेसोबत झालेल्या फसवणुकीतून आपण सर्वांनी धडा घेणे आवश्यक आहे. अशा ऑनलाइन गुंतवणुकीबाबक आपण अत्यंत सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. सध्या महिलेने याप्रकरणी पोलिसांना माहिती दिली आहे. याबाबत पोलिस तपास सुरू आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com