Chandrayaan-3 Update : 'चांद्रयान-3'च्या यशासाठी जग करतंय प्रार्थना; अमेरिका अन् युरोप करतंय मोलाची मदत

ISRO Moon Mission : 23 ऑगस्ट रोजी चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर विक्रम लँडरचे सॉफ्ट लँडिंग करून इस्रो जगाला आपली ताकद दाखवणार आहे.
Chandrayaan-3 Update
Chandrayaan-3 UpdateeSakal

Chandrayaan 3 Mission : भारताच्या 'चांद्रयान-3' मोहिमेकडे अवघ्या जगाचं लक्ष लागलं आहे. 23 ऑगस्ट रोजी चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर विक्रम लँडरचे सॉफ्ट लँडिंग करून इस्रो जगाला आपली ताकद दाखवणार आहे. विशेष म्हणजे अमेरिका आणि युरोपसारखे देशही भारताच्या या मोहिमेच्या यशासाठी प्रार्थना करत आहेत. चांद्रयान-3चे सिग्नल पकडण्यासाठी या दोन्ही देशांच्या अंतराळ संस्था इस्रोला मदत करत आहेत.

चांद्रयान-3 चंद्राच्या त्या भागात उतरणार आहे, जिथे नासा देखील अजून पोहोचलेली नाही. रशियाचं लूना-25 चांद्रयान-3 च्या आधी दक्षिण ध्रुवावर उतरेल, अशी अपेक्षा होती. परंतु लँडिंगपूर्वीच त्याचा अपघात झाल्यामुळे भारत आता या शर्यतीत एकटाच आहे. चांद्रयान-3 नंतर नासाची आर्टेमिस आणि युरोपियन स्पेस एजन्सी चांद्र मोहीम आखणार आहेत. त्यामुळेच दोन्ही अंतराळ संस्थांच्या सगळ्या आशा चांद्रयान-3 वर टिकून आहेत.

Chandrayaan-3 Update
Chandrayaan 3 Landing : चार टप्प्यांमध्ये होणार 'चांद्रयान-3'चं लँडिंग; शेवटच्या 15 मिनिटांमध्ये काय होईल? जाणून घ्या

अमेरिकेला सर्वात जास्त गरज

चांद्रयान-3च्या यशाची अमेरिकेला सर्वात जास्त गरज आहे. इस्रोने नासाच्या आर्टेमिस करारावर स्वाक्षरी केली आहे. त्यामुळे चांद्रयान-3 जी माहिती गोळा करेल ती आर्टेमिस मिशनसाठी उपयुक्त ठरेल, असे सांगण्यात आलं आहे. हे अमेरिकेचे महत्त्वाकांक्षी मिशन आहे, जे तीन टप्प्यात पूर्ण केले जाईल. (ISRO Moon Mission)

नासाच्या आर्टेमिस मोहिमेत पहिल्या टप्प्यात चंद्राच्या कक्षेत रॉकेट सोडण्यात येणार आहे. दुसर्‍या टप्प्यात अंतराळवीर चंद्राच्या कक्षेत जातील आणि तिसर्‍या टप्प्यात अंतराळवीरांना चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरवले जाईल, जेणेकरून ते तेथे सापडलेल्या पाण्यावर आणि इतर खनिजांवर संशोधन करू शकतील.

Chandrayaan-3 Update
Chandrayaan 3 : तामिळनाडूतील कलाकाराने बवनलं सोन्याचं 'चांद्रयान-3'; इस्रोला दिल्या अनोख्या शुभेच्छा! पाहा व्हिडिओ

जपान आणि युरोपचेही लक्ष

चांद्रयान-3 नंतर जपानी स्पेस एजन्सी JAXA आणि युरोपियन स्पेस एजन्सी ESA देखील चंद्र मोहिमेची तयारी करत आहेत. रशिया, अमेरिका आणि चीन व्यतिरिक्त भारत चंद्रावर पोहोचणारा चौथा देश असेल. अनेक वर्षांच्या कालावधीनंतर अशा प्रकारची ही पहिलीच चांद्रमोहीम असेल. अशा परिस्थितीत, युरोपियन स्पेस एजन्सी आणि JAXA देखील मोहिमेच्या यशासाठी प्रार्थना करत आहेत, जेणेकरून ते त्यांच्या चंद्र मोहिमेसाठी यातून माहिती घेऊ शकतील.

इस्रो नासाला मागे टाकेल

चांद्रयान-3 चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणार आहे, आतापर्यंत हे नासालाही शक्य झाले नाही. रशियाचे लुना-25 हे यान उतरण्याआधीच कोसळल्याने रशियाचे हे स्वप्न भंगले. आता भारताला प्रथम दक्षिण ध्रुवावर पोहोचण्याची संधी आहे. या मोहिमेकडे जगाचे लक्ष लागले आहे कारण चंद्राचा हा भाग अतिशय खडबडीत आहे, तेथे मोठे खड्डे आहेत. त्यामुळे इथे सॉफ्ट लँडिंग करणं मोठं आव्हान आहे. जर भारताचे चांद्रयान-3 येथे सॉफ्ट लँडिंग करण्यात यशस्वी झाले तर ते ऐतिहासिक ठरेल.

Chandrayaan-3 Update
Chandrayaan-3: चांद्रयान-3 ने चंद्रावर पाऊल ठेवताच, भारताच्या अर्थव्यवस्थेला असा होईल फायदा

नासा आणि युरोप करतंय मदत

चांद्रयान-३च्या यशासाठी अमेरिकेची नासा आणि युरोपियन स्पेस एजन्सी सतत मदत करत आहेत. विशेषतः युरोपच्या ईएसएचं अंतराळ नेटवर्क इस्रोसाठी खूप उपयुक्त आहे. द हिंदू मधील वृत्तानुसार, ESA चांद्रयानचा सतत मागोवा घेत आहे आणि टेलीमेट्री डेटा इस्रोला पाठवत आहे. जर्मनीतील युरोपियन स्पेस एजन्सीचे ग्राउंड ऑपरेशन इंजिनीअर रमेश चेल्लाथुराई यांनी ही माहिती दिली.

याशिवाय, नासा कॅनबेरा आणि माद्रिदमध्ये असलेल्या डीप स्पेस नेटवर्ककडून टेलिमेट्री आणि ट्रॅकिंग डेटा देखील प्राप्त करत आहे आणि चांद्रयान-3 च्या स्थितीचे निरीक्षण करून इस्रोला डेटा पाठवत आहे.

Chandrayaan-3 Update
Chandrayaan-3 Landing Timing : चांद्रयान-३ चे लँडिंग उद्या झाले नाही तर...; इस्त्रोच्या वैज्ञानिकाने दिली महत्वाची माहिती

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com