World Television Day: जाणून घ्या दूरदर्शन दिनाचा इतिहास, महत्व | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

World Television Day: जाणून घ्या दूरदर्शन दिनाचा इतिहास, महत्व
World Television Day: जाणून घ्या दूरदर्शन दिनाचा इतिहास, महत्व

World Television Day: जाणून घ्या दूरदर्शन दिनाचा इतिहास, महत्व

आज इंटरनेटमुळे बरीच प्रगती झाली आहे. कोणतीही माहिती एका क्लीकवर सहज मिळू शकते. दुरर्दशनवरील कोणतेही जुने कार्यक्रम आता सहज बघता येऊ शकतात. असे असले तरी एक गोष्ट मात्र अद्याप पूर्णपणे बदलू शकलेली नाही ती म्हणजे टेलिव्हिजन. टिव्हीने लोकांच्या मनाचा ठाव घेतला आहे. दूरचित्रवाणीने जनमत घडवण्याचे काम केले आहे.

संयुक्त राष्ट्र दरवर्षी 21 नोव्हेंबर रोजी जागतिक दूरदर्शन दिन साजरा करते. समाजात दुरदर्शनचे असणारे वाढते महत्व आणि प्रभाव ओळखण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. धोरणे तयार करणे, निर्णय तयार करणे आणि माहितीचे चॅनेलिंग करणे यासाठी टेलिव्हिजनचे महत्व जास्त आहे. यासाठीच हा दिवस साजरा केला जातो. दूरदर्शन पाहण्याचा प्रभाव छोटा असला तरी तो समजात मोठा बदल घडवून आणतो. तसेच जागतिक राजकारणावरही तो मोठ्या प्रमाणात प्रभाव टाकू शकतो.

हेही वाचा: मुलं क्यॅव क्यॅव करताहेत! त्यांना कसं गप्प कराल, फॉलो करा 'या' टीप्स

युनायटेड नेशन्सच्या आकडेवारीनुसार, 2023 पर्यंत टेलिव्हिजन असलेल्या कुटुंबाची संख्या अंदाजे 1.73 अब्ज असेल. तर ऑक्टोबर 2021 पर्यंत नेटफ्लिक्स वापरणाऱ्या लोकांची संख्या 214 दशलक्ष आहे. त्यामुळे ही संख्या पाहता दुरदर्शनच्या तुलनेत डिजिटल स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मला अजून मोठा पल्ला गाठावा लागणार आहे.

युनायटेड नेशन्सने 17 डिसेंबर 1996 रोजी एक समिती तयार केली. त्यांनी समाजाच्या मनात दूरगामी परिणाम करणारे तसेच आर्थिक, सामाजिक आणि सांस्कृतिक पैलूंशी संबंधित माहितीच्या जागतिक देवाणघेवाण करणारे माध्यम म्हणून टेलिव्हिजनचे महत्त्व ओळखले. त्यासाठीच समितीने २१ नोव्हेंबर हा जागतिक दूरचित्रवाणी दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला.

हेही वाचा: कमरेचा आकार, ब्रा ते पायाची साइज! Matrimonial Ad मध्ये तरूणाच्या विचित्र अटी

loading image
go to top