कमरेचा आकार, ब्रा ते पायाची साइज! Matrimonial Ad मध्ये तरूणाच्या विचित्र अटी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कमरेचा आकार, ब्रा ते पायाची साइज! Matrimonial Ad मध्ये तरूणाच्या विचित्र अटी
कमरेचा आकार, ब्रा ते पायाची साइज! Matrimonial Ad मध्ये तरूणाच्या विचित्र अटी

कमरेचा आकार, ब्रा ते पायाची साइज! Matrimonial Ad मध्ये तरूणाच्या विचित्र अटी

लग्नासाठी योग्य जोडीदार निवडण्यासाठी अनेकजण वेगवेगळ्या मॅट्रीमोनियल साईटवर आपले नाव नोंदवतात. त्यावर लोकांच्या अपेक्षा वाचून या माणसाला लग्न नेमकं कशासाठी करायचं आहे असा प्रश्न पडतो. काहींच्या अपेक्षा तर फारच विचित्र असतात. एका तरूणाची बायकोसाठी असणारी अपेक्षा अशीच व्हायरल होते आहे. रेडिट या सोशल मीडिया साईटवरून ती ट्विटरवर व्हायरल झाली आहे.

Betterhalf.ai या मॅट्रीमोनियल साईटवर नाव नोंदवलेल्या एका तरूणाने जाहिरातीच्या पहिल्या तीन ओळींमध्ये मुलीबद्दलच्या अपेक्षा लिहिल्या आहेत. यात त्याने ब्रा आणि पायाच्या साईजपर्यंतच्या अपेक्षा सांगितल्या आहे. बेडरूममध्ये ती कशी असावी हे सांगत ‘कंझर्व्हेटिव्ह’, ‘लिबरल,’ ‘प्रो-लाइफ’ यांसारख्या मूल्यांबाबत त्याला बायकोकडून काय हवे आहे हे सांगितले आहे.

हेही वाचा: आदर्श पती-पत्नीच्या नात्यातील 'या' आहेत पाच गोष्टी

या आहेत अपेक्षा

मुलगी 18 ते 26 वयोगटातील असावी. तिच्या कमरेचा आकार, ब्रा साईज, बेडवरचे कपडे कसे घालावेत, या अपेक्षांबरोबरच पार्टनरनं मॅनिक्यूअर-पेडीक्यूअर केलंलं असावं. कारण ती अतिशय स्वच्छ दिसेल, हेही त्याने म्हटले आहे. तिचे कपडे 80% कॅज्युअल आणि 20% फॉर्मल असावेत ही अपेक्षा आहे. मुलगी विश्वासू असावी,. तिने चित्रपट, रोड ट्रिप्स आणि कौंटुबीक समारंभांमध्येही सहभागी व्हावे, अशाही काही अपेक्षा व्यक्त केल्या आहेत. त्याने स्वतःची काही खासगी माहितीही शेअर केली आहे.

हेही वाचा: कैसा ये प्यार है... एकतर्फी प्रेमाच्या वेदनेतून बाहेर पडण्यासाठी हे करा

नेटकऱ्यांची टिका

ही जाहिरात व्हायरल होताच नेटकऱ्यांनी खूप टिका केली आहे. एका युजरने अशी मुलगी 2077 पर्यंत मिळेल असे म्हटले आहे. तर एकाने हा व्यक्ती लेडीज टेलर आहे का अशी टिका केली आहे. मात्र या जाहिरातीबाबत Twitterati ने याबाबत कंपनीला नोटीस पाठवताच आवश्यक कारवाई केली गेली

loading image
go to top