WWDC 2023 : अ‍ॅपलने पुन्हा सादर केले दमदार प्रॉडक्ट्स; पाहा यावर्षी काय ठरलं खास?

यामध्ये व्हिजन प्रो हेडसेट आणि 15 इंचाचा मॅकबुक एअर यांच्यासह अन्य अनेक प्रॉडक्ट्सचा समावेश आहे.
WWDC 2023
WWDC 2023Esakal

वर्ल्डवाईड डेव्हलपर कॉन्फरन्समध्ये (WWDC 2023) दरवर्षीप्रमाणे याही वर्षी अ‍ॅपलने आपले कित्येक प्रॉडक्ट्स लाँच केले. यामध्ये व्हिजन प्रो हेडसेट आणि 15 इंचाचा मॅकबुक एअर यांच्यासह अन्य अनेक सॉफ्टवेअर, हार्डवेअर आणि सेवांचा समावेश होता. कोणते आहेत हे प्रॉडक्ट्स, जाणून घेऊया.

यावर्षीच्या WWDC चा हायलाईट ठरला अ‍ॅपलचा मिस्क्ड रिअ‍ॅलिटी हेडसेट - व्हिजन प्रो. यासोबतच अ‍ॅपलने मॅकबुक एअर, मॅक प्रो, आयओएस 17, मॅकओएस सोनोमा, टीव्हीओएस 17, वॉचओएस 10 या गोष्टी सादर केल्या.

WWDC 2023
आयफोनसोबत चार्जर का मिळत नाही? जाणून घ्या : iPhone Charger

15-इंच मॅकबुक एअर

अ‍ॅपलने या कार्यक्रमात 15 इंच मोठा असा मॅकबुक एअर लाँच केला. याची रुंदी 11.5 mm आहे, तर वजन 1.3 किलो आहे. यामध्ये अ‍ॅपलची M2 चिपसेट देण्यात आली आहे. यामध्ये दोन यूएसबी-सी टाईप पोर्ट देण्यात आलेत. यासोबतच, अ‍ॅपलचं मॅगसेफ चार्जिंग डॉक आणि स्टँडर्ड हेडफोन जॅकही यात देण्यात आला आहे.

पूर्ण चार्ज केल्यावर हा 15-inch MacBook Air 18 तासांचा बॅकअप देतो. यामध्ये 8 कोअर सीपीयू आणि 10 कोअर जीपीयू देण्यात आलाय. नवीन मॅकबुक एअर चार रंगांमध्ये उपलब्ध आहे. याची किंमत 1,34,900 रुपयांपासून सुरू होते. हा आजच तुम्ही प्री-बुक करू शकता. पुढच्या आठवड्यापासून याची विक्री सुरू होईल.

न्यू मॅक प्रो

अ‍ॅपलच्या मॅक लाईनअपमधील नवीन सदस्य म्हणजे सुपरचार्ज्ड मॅक प्रो. M2 अल्ट्रा 24 कोअर सीपीयू, 76 कोअर जीपीयू, 8 थंडरबोल्ट 4 पोर्ट्स आणि अ‍ॅपलचा हाय एं प्रो डिस्प्ले XDR असे दमदार फीचर्स यात देण्यात आले आहेत. या मॅक प्रो ला स्टेनलेस स्टील फ्रेम देण्यात आली आहे. क्रिएटिव्ह क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्ती आणि डिझाईनर्स यांना डोळ्यासमोर ठेऊन हा मॅक डिझाईन करण्यात आला आहे.

New Mac Pro ची किंमत 7,29,9900 रुपयांपासून सुरू होते. यासोबतच अ‍ॅपलने अपडेटेड मॅक स्टुडिओ देखील लाँच केला. हा स्टुडिओ M2 मॅक्स किंवा M2 अल्ट्रा चिपसेटना सपोर्ट करतो. याची किंमत 2,09,900 रुपयांपासून सुरू होते.

व्हिजन प्रो

अ‍ॅपलने आपला मिक्स्ड रिअ‍ॅलिटी हेडसेट Vision Pro बाबत या कार्यक्रमात माहिती दिली. या डिव्हाईसच्या मदतीने डोळे, डोकं आणि आवाजाच्या माध्यमातून तुम्ही अ‍ॅप्स आणि इतर टूल्स कंट्रोल करू शकणार आहात. हे हेडसेट घातल्यानंतर त्यातून चष्मा घातल्याप्रमाणे पलीकडे देखील पाहता येणार आहे. आयर्न मॅन चित्रपटात दाखवल्याप्रमाणे तुमच्या आजूबाजूला ऑग्मेंटेड रिअ‍ॅलिटीमध्ये तुम्हाला अ‍ॅप्स आणि कंटेंट दिसणार आहे.

या हेडसेटमध्ये 3D कॅमेरा देण्यात आला आहे. सोबतच, यातील आयसाईट फीचरमुळे तुमचे डोळेही बाहेरून दिसू शकणार आहेत. व्हीआर आणि एआर याचं हे फ्युजन आहे. अ‍ॅपलच्या M2 चिपसेटवर हे काम करतं. यासोबतच R1 नावाची एक चिपदेखील यामध्ये देण्यात आली आहे. 'रिअल टाईम सेन्सर प्रोसेसिंग'चं काम ही नवी चिप करणार आहे.

या डिव्हाईससाठी अ‍ॅपलने नवीन व्हिजन-ओएस देखील तयार केली आहे. पुढील वर्षाच्या सुरुवातीला हे हेडसेट लाँच केले जातील. सुरुवातीला केवळ अमेरिकेत यांची विक्री सुरू होईल, त्यानंतर हळू-हळू इतर देशांमध्ये हे उपलब्ध होतील. याची सुरुवातीची किंमत 3,499 डॉलर्स एवढी असणार आहे.

सॉफ्टवेअर अपडेट्स

अ‍ॅपलने यावेळी आपल्या अनेक ऑपरेटिंग सिस्टीम्सचे अपडेट सादर केले. यामध्ये iOS 17, iPadOS 17, macOS Sonoma, tvOS 17 आणि watchOS 10 यांचा समावेश आहे. एकंदरीत अ‍ॅपलने आपला आयफोन, आयपॅड, मॅक, टीव्ही आणि वॉच या सर्व प्रॉड्क्ट्सचे सॉफ्टवेअर अपडेट केले आहेत.

आयफोनच्या नवीन ओएसमध्ये (iPhone New OS) भरपूर फीचर्स देण्यात आले आहेत. यातील मुख्य फीचर म्हणजे नेमड्रॉप. या फीचरमुळे यूजर्स दोन आयफोन किंवा दोन अ‍ॅपल वॉच एकत्र वापरू शकतील. यासोबतच, दोन व्यक्ती कॉन्टॅक्ट्स, म्युझिक, इंटरनेट किंवा अशा अन्य गोष्टी एकमेकांसोबत शेअर करू शकतील.

WWDC 2023
IPhone Battery Drain : आयफोनमध्ये येतोय बॅटरीचा प्रॉब्लेम? अशा पद्धतीने वाढवा बॅटरी लाईफ

अ‍ॅपलचा व्हिडिओ आणि ऑडिओ प्लॅटफॉर्म असणाऱ्या फेसटाईम या अ‍ॅपमध्येही अपडेट आला आहे. यूजर्स आता एकमेकांना व्हॉईसमेल प्रमाणे व्हिडिओ मेल पाठवू शकणार आहेत. यासोबतच, अ‍ॅपलने यूजर्सच्या सुरक्षेसाठी नवीन फीचर जाहीर केलंय. या माध्यमातून तुम्ही ग्रुप चॅटमध्ये ऑटो नोटिफिकेशन सुरू करू शकाल, ज्यामुळे तुम्ही एखाद्या ठिकाणी सुरक्षित पोहोचला आहात याची खात्री तुमच्या मित्रांना किंवा कुटुंबीयांना होऊ शकेल.

संपूर्ण यूआय होईल चेंज

यासोबत नवीन iOS17 मध्ये आणखी एक फीचर देण्यात आलंय. यामुळे जेव्हा तुम्ही फोन आडवा ठेवाल, तेव्हा लॉक स्क्रीनचा इंटरफेस बदलून जाईल. जेणेकरून त्या पोझिशनमद्ये देखील तुम्ही मोबाईल वापरू शकाल.

टीव्हीओएस

अ‍ॅपलच्या टीव्हीमध्येही (tvOS) मोठे अपडेट देण्यात आलेत. यातील मुख्य फीचर म्हणजे, फेसटाईम हे आता अ‍ॅपल टीव्हीवर उपलब्ध होणार आहे. यामुळे यूजर्स आयफोन किंवा आयपॅडचा कॅमेरा वापरून थेट टीव्हीच्या मोठ्या स्क्रीनवरून व्हिडिओ कॉल करू शकणार आहेत.

WWDC 2023
Apple Company : ॲपलचा चालूपणा ॲपललाच नडला! बसला 163 अब्जांचा फटका

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com