Twitter Down ! सलग दुसऱ्या दिवशी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X डाऊन, जगभरात युजर्स वैतागले
X Down : शुक्रवारी हजारो युजर्सनी तक्रार केली होती की त्यांना मेसेजेस करता येत नाहीयेत. तसंच मेसेज ओपनही होत नाहीत. पुन्हा पुन्हा रिलोड करण्याचाच मेसेज दाखवत आहे.
सलग दुसऱ्या दिवशी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स (ट्विटर) डाउन झालं आहे. अनेक युजर्सना एक्सवर नोटिफिकेशन, मेसेजेस आणि पोस्ट करण्यात अडचणी येत आहेत. शुक्रवारीही अनेक युजर्सनी याबाबत तक्रार केली होती. त्यानंतरही आजही युजर्सना एक्स वापरताना अडचणी आल्या.