शाओमीच्या फोनवर बंपर ऑफर! मिळेल फ्री Mi Band 5, कॅशबॅक अन् बरंच काही

Xiaomi 11T Pro
Xiaomi 11T Pro

Xiaomi ने अखेर बुधवारी भारतीय बाजारात आपला बहुप्रतिक्षित स्मार्टफोन Xiaomi 11T Pro लॉन्च केला आहे. फोन 108MP कॅमेरा आणि 120W फास्ट चार्जिंग देण्यात आली असून. फोनची किंमत 39,999 रुपयांपासून सुरु होते. दरम्यान कंपनी ऑफलाइन ग्राहकांना फोनवर अनेक बंपर ऑफर देत आहे. चला जाणून घेऊया..

फोनची किंमत किती आहे?

भारतात, फोनच्या 8GB + 128GB व्हेरिएंटची किंमत 39,999 रुपये, 8GB + 256GB व्हेरिएंटची किंमत 41,999 रुपये आहे. तसेच या फोनच्या टॉप-एंड मॉडेलसाठी म्हणजेच 12GB + 256GB व्हेरिएंटसाठी तुम्हाला 43,999 रुपये खर्च करावे लागतील. मात्र कंपनीने ऑनलाइन खरेदीदारांसाठी 11T Pro वर 5,000 रुपयांची सूट जाहीर केली होती. कंपनीने लाईव्ह इव्हेंट दरम्यान ऑफलाइन कोणत्याही ऑफर जाहीर केल्या नाहीत. पण आता कंपनीच्या एका अधिकाऱ्याने या फोनच्या ऑफलाइन रिटेल ऑफरचा खुलासा केला आहे, ज्यामध्ये याची सुरुवातीची किंमत 39,999 रुपये आहे. या ऑफर पैकी एकामध्ये Mi Band 5 स्मार्ट बँड (किंमत 2499 रुपये) फ्री देण्यात येत आहे.

Fitband व्यतिरिक्त, कंपनी 3,000 रुपयांपर्यंतचा कॅशबॅक देखील देत आहे. हे मॉडेलनुसार बदलू शकते. याशिवाय, कंपनी झिरो डाउन पेमेंट आधारित ईएमआय ऑप्शन देखील देत आहे. याशिवाय, संभाव्य खरेदीदार एक्सचेंजवर 5,000 रुपयांची अतिरिक्त सूट देखील मिळू शकतो. ही ऑफर 19-31 जानेवारीपर्यंत वैध आहे. असे गिझमोचायनाच्या रिपोर्टध्ये म्हटले आहे.

Xiaomi 11T Pro
फक्त फोन सुरु ठेवायचाय? हे आहेत Jio, Airtel अन् Vi चे बेस्ट प्लॅन्स

Xiaomi 11T Pro 5G चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

- फोनमध्ये 1080x2400 पिक्सेल रिझोल्यूशनसह 6.67-इंच फुल एचडी + फ्लॅट AMOLED डिस्प्ले आहे. डॉल्बी व्हिजन सपोर्टसह येत असलेल्या, या डिस्प्लेचा रिफ्रेश दर 120Hz आणि टच सॅम्पलिंग रेट 480Hz आहे. डिस्प्ले प्रोटेक्शनसाठी यामध्ये कॉर्निंग गोरिल्ला ग्लास व्हिक्टस देण्यात आला आहे. Xiaomi चा हा फ्लॅगशिप हँडसेट 12GB पर्यंत LPDDR5 रॅम आणि 256GB पर्यंत UFS 3.1 स्टोरेजसह येतो. कंपनी फोनमध्ये 3GB एक्स्टेंडेड व्हर्च्युअल रॅम देखील देत आहे. या फोनमध्ये प्रोसेसर म्हणून स्नॅपड्रॅगन 888 SoC देण्यात आला आहे.

- फोटोग्राफीसाठी फोनमध्ये एलईडी फ्लॅशसह ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. यात 8-मेगापिक्सेल अल्ट्रा-वाइड अँगल लेन्स आणि 5-मेगापिक्सेल टेलीमॅक्रो सेन्सरसह 108-मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा मिळतो. सेल्फीसाठी कंपनी या फोनमध्ये 16-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देत आहे.

साइड-माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सरने सुसज्ज असलेल्या या फोनमध्ये 5000mAh बॅटरी आहे. ही बॅटरी 120W हायपरचार्ज फास्ट वायर्ड चार्जिंगला सपोर्ट करते. कनेक्टिव्हिटीसाठी फोनमध्ये 5G, 4G LTE, Wi-Fi 6, Bluetooth, GPS/A-GPS, NavIC, NFC आणि USB Type-C पोर्ट सारखे फीचर्स देण्यात आले आहेत.

Xiaomi 11T Pro
फ्लिपकार्ट, ॲमेझॉन वर 17 जानेवारीपासून रिपब्लिक डे सेल! मिळेल बंपर सूट

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com