Xiaomi 13 Pro चा आज 12 वाजल्यापासून सेल सुरु, फिचर्स, किंमत संपूर्ण माहिती एका क्लिकवर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Xiaomi 13 Pro

Xiaomi 13 Pro चा आज 12 वाजल्यापासून सेल सुरु, फिचर्स, किंमत संपूर्ण माहिती एका क्लिकवर

Xiaomi 13 Pro First Sale in India Price : Xiaomi ने अलीकडेच 26 फेब्रुवारी रोजी मोबाईल वर्ल्ड काँग्रेसमध्ये आपला फ्लॅगशिप स्मार्टफोन Xiaomi 13 Pro लॉन्च केला. आता या स्मार्टफोनचा पहिला सेल आजपासून म्हणजेच 10 मार्चपासून सुरू होणार आहे.

Xiaomi ने हा स्मार्टफोन लेटेस्ट फीचर्स आणि हार्डवेअर डिझाइनसह बाजारात लॉन्च केला आहे. कॅमेराप्रेमींना हा स्मार्टफोन पसंतीस उतरला आहे. (Xiaomi 13 Pro sale in India begins today: Where to buy, price, offers and features)

Xiaomi ने 6 मार्च रोजी Xiaomi 13 Pro ला अर्ली ऍक्सेस सेलसाठी देखील उपलब्ध करून दिले होते आणि त्याला लोकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला होता.

अर्ली ऍक्सेस सेल 6 मार्च रोजी दुपारी 12 वाजता झाला आणि काही मिनिटांतच Xiaomi 13 Pro स्टॉक संपला.

तुम्हाला जर फोन विकत घ्यायचा असेल तर तुम्ही आज दुपारी 12 वाजता Amazon वरून बुक करू शकता. Xiaomi 13 Pro च्या रियर कॅमेरामध्ये 1 इंच कॅमेरा सेंसर देण्यात आला आहे.

Xiaomi 13 Pro मध्ये 12 GB रॅम आणि 256 GB स्टोरेज सह व्हेरिएंटची किंमत 79,999 रुपये आहे परंतु आजच्या सेल दरम्यान अतिशय स्वस्त किंमतीत खरेदी करता येऊ शकते.

पहिल्या सेलमध्ये Xiaomi या फ्लॅगशिप स्मार्टफोनवर मोठ्या प्रमाणात सूट देत आहे. यासोबतच खरेदीदारांना एक्सचेंज ऑफरही पाहायला मिळतील. जर तुमच्याकडे ICICI बँकेचे कार्ड असेल तर तुम्हाला जास्त सवलत मिळेल. यामध्ये तुम्ही फक्त 69,999 रुपयांमध्ये खरेदी करू शकता.

Xiaomi 13 Pro चे फिचर्स :

  • Xiaomi 13 Pro मध्ये 6.73-इंचाचा LTPO AMOLED डिस्प्ले आहे. डिस्प्लेमध्ये HDR10+ सपोर्ट करण्यात आला आहे.

  • डिस्प्लेमध्ये कॉर्निंग गोरिला ग्लास व्हिक्टसचे संरक्षणही देण्यात आले आहे.

  • Xiaomi 13 Pro मध्ये Qualcomm Snapdragon 8 Gen 2 प्रोसेसर देण्यात आला आहे.

  • यामध्ये अनेक मेमरी पर्याय उपलब्ध आहेत. तुम्ही ऑनलाइन बाजारातून 128GB 8GB RAM, 256GB 8GB RAM, 256GB 12GB RAM, 512GB 12GB रॅम व्हेरिएंट खरेदी करू शकता.

  • Xiaomi 13 Pro च्या मागील बाजूस ट्रिपल कॅमेरा स्लॉट देण्यात आला आहे. सर्व कॅमेरे 50 मेगापिक्सेल सेन्सरसह येतात. कॅमेरामध्ये OIS फीचर देखील देण्यात आला आहे. सेल्फीसाठी 32 मेगापिक्सेल कॅमेरा उपलब्ध करून देण्यात आला आहे.

  • Xiaomi 13 Pro मध्ये 4820 mAh बॅटरी आहे, ज्यामध्ये 120 W चा चार्जर देण्यात आला आहे. कंपनीचा दावा आहे की हे फक्त 9 मिनिटांत पूर्ण चार्ज होऊ शकते.

टॅग्स :IndiasaleMobile Phone